बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)ने जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतले. यादरम्यानचे तिचे फोटो खूप व्हायरल झाले. अभिनेत्री मोठ्या हसत हसत लोकांना भेटली आणि सेल्फी काढली. यावेळी त्यांनी श्राइन बोर्डाचेही कौतुक केले आहे.
जॅकलिन फर्नांडिसने 4 जानेवारीला श्री माता वैष्णो देवी मंदिरात दर्शन घेतले. ती पहाटे कटरा येथे पोहोचली. कटरा येथे काही काळ राहिल्यानंतर तिने पायी चालत जाऊन मंदिरात पूजा-अर्चा केली. संध्याकाळी ती कटरा येथे परतली. जॅकलिन फर्नांडिसनेही भाविकांना सर्व सुविधा पुरवल्याबद्दल श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे कौतुक केले आहे.
चित्रपटांपेक्षा जॅकलिन सध्या पर्सनल आयुष्याला घेऊन खूप जास्त चर्चेत आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन अडकली आहे. यामुळे ती ईडीच्या निशाण्यावर आली आहे.
काही दिवसांपूर्वी नोरा फाहतीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात जॅकलिनने जबरदस्तीने तिचे नाव वापरल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्याचवेळी आता जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाचे वक्तव्य समोर आले आहे. मात्र, जॅकलिनच्या वकिलाचे म्हणणे आहे की, तिने या प्रकरणाबाबत कधीही सार्वजनिकरित्या नोरा फतेहीच्या विरोधात बोलले नाही किंवा तिने कोणत्याही प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संवाद साधला नाही. त्यामुळे बदनामीचा प्रश्नच उद्भवत नाही.