Join us

सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर 'खुर्ची' धोक्यात, अर्चना पुरणसिंगने स्पष्टच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:46 PM

ही टिंगल किंवा विनोद अनेक वर्षांपासून होत आहे, पण खरी बाब म्हणजे मला याने काहीही फरक पडत नाही, किंवा मी यास गंभीरतेनंही घेत नाही. जर खरंच सिद्धू हे पुन्हा शोमध्ये एंट्री करत आहेत.

ठळक मुद्दे माझ्या जागेवर येत असतील, तर मला आणखीही खूप कामं आहेत. जे मी करू शकते, मी गेल्या अनेक वर्षांपासून काहीतरी वेगळं करू इच्छिते, असे अर्चना सिंग यांनी म्हटले आहे.

मुंबई - पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. सिद्धूंनी राजीनामा दिल्यानंतरही अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा देताच ट्विटरवर अर्चना पुरणसिंग यांच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला होता. त्यामुळे, आता स्वत: अर्चना यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिलंय.  नवज्योतसिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर सिद्धू यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यानंतर, काही वेळातच अभिनेत्री आणि कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंह सिद्धू यांची खुर्ची सांभाळणाऱ्या अर्चना पुरणसिंग यांनाही नेटीझन्सने ट्रेंड करायला सुरुवात केली आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यामुळे आता अर्चना यांची खुर्ची धोक्यात आल्याचं अनेकांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, यासंदर्भातील अनेक मिम्सही ट्विट झाले. त्यामुळे, एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अर्चना पुरणसिंग यांनी मला आणखी बरीच कामं आहेत, असे म्हटले आहे. 

ही टिंगल किंवा विनोद अनेक वर्षांपासून होत आहे, पण खरी बाब म्हणजे मला याने काहीही फरक पडत नाही, किंवा मी यास गंभीरतेनंही घेत नाही. जर खरंच सिद्धू हे पुन्हा शोमध्ये एंट्री करत आहेत. माझ्या जागेवर येत असतील, तर मला आणखीही खूप कामं आहेत. जे मी करू शकते, मी गेल्या अनेक वर्षांपासून काहीतरी वेगळं करू इच्छिते, असे अर्चना सिंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सिद्धूसाठी आपण कधीही खुर्ची सोडायला तयार आहोत, असेच त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अर्चना या कपिल शर्मा शो या कॉमेडी शोमध्ये पूर्वी सिद्धू ज्या खुर्चीवर बसायचे, तेथे बसत आहेत. अनेकदा कपिलही त्यांना या खुर्चीवरुन टोला लगावत असतो. मात्र, सिद्धूंच्या राजीनाम्यामुळे पुन्हा खुर्चीचा विषय चर्चेत आला आहे.  

टॅग्स :अर्चना पूरण सिंगनवज्योतसिंग सिद्धूकपिल शर्मा पंजाब