Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बॉर्डर 2' मध्ये 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 18:26 IST

'बॉर्डर 2' मध्ये एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

1997 मध्ये रिलीज झालेला जेपी दत्ता यांचा 'बॉर्डर' हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठा हिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर म्हणून घोषित झाला होता. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता, ज्यामध्ये अभिनेता सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा आणि इतर अनेक कलाकार दिसले होते. आता तब्बल 27 वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  यामध्ये सनी देओल (Sunny Deol) तर मुख्य भूमिकेत आहेच. शिवाय आता आणखी एका अभिनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोण आहे तो अभिनेता? 

'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टी पाहायला मिळाला होता. भैरव सिंहच्या भूमिकेत त्याने लोकांचं प्रेम मिळवलं. आता सिनेमाच्या सिक्वेलमध्ये ज्युनियर शेट्टीची एन्ट्री झाली आहे. म्हणजेच सुनील शेट्टीचा लेक अहान शेट्टी हा  'बॉर्डर 2'मध्ये  दिसणार आहे. सनी देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम ही माहिती शेअर केली आहे.

'बॉर्डर 2'  सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असली तरी या चित्रपटासाठी त्यांना वाट लागणार आहे. प्रजासत्ताक दिनाचं प्रेक्षकांना खास गिफ्ट मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 2026 मध्ये 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत.  तर आतापर्यंत सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची नावं फायनल झाली आहेत. आणखी कोणते अभिनेते या बटालियनमध्ये सामील होतात, हे पाहणं महत्वाचं आहे. 

अहान शेट्टीबद्दल बोलायचं झालं तर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेत्री तारा सुतारिया हिच्यासोबत अहान याने 'तडप' सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. याशिवाय, तो खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण, त्यांचं नात तुटलं. अहान आणि तानिया यांच्यामध्ये दुरावा का निर्माण झाला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

टॅग्स :अहान शेट्टीसुनील शेट्टीसनी देओलवरूण धवन