रिया चक्रवर्तीच्या आयुष्यावर बनतोय सिनेमा, मुंबईत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:17 PM2020-09-03T18:17:27+5:302020-09-03T18:41:10+5:30
रिया चक्रवर्तीवर आधारित सिनेमा तयार करण्यात येणार आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. तेव्हापासून रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी रियाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन एजेंसी तपास करत आहेत. दररोज या प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीवर आधारित सिनेमा तयार करण्यात येणार आहे. सिनेमाच्या टायटलपासून ते कथेपर्यंत अनेक गोष्टीसमोर आल्या आहेत.
वकील विकास सिंग यांनी दिला थेट इशारा
काही दिवसांपूर्वी सुशांतच्या प्रकरणावर देखील सिनेमा बनवण्याची तयार सुरु होती. या सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनी यावर हरकत घेतली. तसेच सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला. कोणताही निर्माता वा दिग्दर्शक सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार नाही किंवा त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहू शकणार नाही. असे झाल्यास सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते.
रियाच्या आयुष्यावर सिनेमा
आता रियाच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्यात येणार असल्याची चर्चा सगळीकडे जोरात सुरु आहे. या सिनेमाचे नाव 'न्याय द जस्टिस'. श्रुती मोदीचे वकील अशोक सरोवगी आणि त्यांची पत्नी सरला सरोवगी सुशांत-रिया प्रकरणावर आधारित सिनेमा तयार करणार आहेत. याचा शूटिंगला देखील सुरुवात करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार सिनेमाची स्क्रिप्ट वकील अशोक सरोवगी यांच्या डायरीतून तयार केली आहे.या चित्रपटात टीव्ही अभिनेता झुबेर के खान सुशांत सिंग राजपूतच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री श्रेया शुक्ला रियाच्या भूमिकेत दिसणार आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबईत या सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात आले आहे.
रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!