सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:20 PM2020-06-22T13:20:35+5:302020-06-22T13:26:08+5:30

सलमान-शाहरुख यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

after sushant singh rajput suicide hashtag boycott khans top trend on twitter | सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये

सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वप्रथम दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमानवर आरोप केले होते. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत या जगातून गेला. पण जातांना अनेक प्रश्न मागे ठेवून गेला. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा पेटला आहे. सुशांत याच घराणेशाहीचा बळी ठरला, असा आरोप होत आहे. सलमान खान, करण जोहर, एकता कपूर या सर्वांना या घराणेशाहीसाठी जबाबदार ठरवले जातेय. सोशल मीडियावर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. तूर्तास ट्विटरवर ‘BoycottKhans’ हा हॅगटॅग ट्रेंड करतोय. केवळ सलमानच नाही तर शाहरूख खान आणि आमिर खान यांनाही बायकॉट करण्याची मागणी याद्वारे होतेय.

सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर आणि सलमान खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. दोघांविरोधात एक आॅनलाइन याचिकाही दाखल करण्यात आली. अशात आता ट्विटरवर बॉलिवूडच्या तिन्ही खानांवर बहिष्कार करण्याची मागणी होत आहे. असंख्य युजर्सनी सलमान, शाहरूख व आमिर यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी लावून धरली आहे.

 आता हे ढोंग सोड...
सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेता सलमान खानला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कालच त्याने मौन सोडत यावर प्रतिक्रिया दिली होती. ट्विटरवर त्याने त्याच्या चाहत्यांना एक आवाहन केले होते.  ‘माझ्या चाहत्यांनी माझी अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा. सुशांतच्या चाहत्यांच्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायी असते,’असे सलमानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.  त्याच्या या ट्विटनंतर त्याला आणखी ट्रोल केले जात आहे.  अ‍ॅक्टिंग चांगली करतोय, आता हे ढोंग सोड, असे काहींनी त्याला सुनावले आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर सर्वप्रथम दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमानवर आरोप केले होते. सलमान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असा आरोप त्याने केला होता. गायक सोनू निगम याने सुद्धा नाव न घेता सलमानवर निशाणा साधला होता.


 
 

Web Title: after sushant singh rajput suicide hashtag boycott khans top trend on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.