Join us

'स्वातंत्र्य वीर सावरकर'नंतर अंकिता लोखंडे झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:37 IST

Ankita Lokhande : रणदीप हुड्डा दिग्दर्शित-अभिनीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटानंतर अंकिता लोखंडे 'आम्रपाली' बनणार आहे. निर्माता संदीप सिंग प्राचीन भारतातील वैशाली प्रजासत्ताकातील शाही नृत्यांगना आम्रपालीच्या जीवनाचा इतिहास मांडण्यासाठी सज्ज आहेत.

रणदीप हुड्डा (Randeep Hudda) दिग्दर्शित-अभिनीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Sawarkar) चित्रपटानंतर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) 'आम्रपाली' (Aamrapali Movie) बनणार आहे. निर्माता संदीप सिंग प्राचीन भारतातील वैशाली प्रजासत्ताकातील शाही नृत्यांगना आम्रपालीच्या जीवनाचा इतिहास मांडण्यासाठी सज्ज आहेत. यात अंकिताला प्रसिद्ध आणि ग्लॅमरस नगरवधू आम्रपालीची प्रसिद्ध भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आलं आहे. 

संदीप सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. 'आम्रपाली' या वेब सीरिजचे पोस्टर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत त्याने या वेब सीरिजचे शूटिंग सुरू झाल्याचे सांगितले आहे. संदीप सिंगने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, शक्ती आणि नम्र अंकिता लोखंडेला आम्रपाली म्हणून सादर केले जात आहे. ही वेब सिरीज एका शाही गणिकेच्या अनकथित कथेवर प्रकाश टाकते, तिच्या भावना आणि आव्हानांनी भरलेला प्रवास हायलाइट करते.

शाही गणिका होण्यापासून ते बौद्ध नन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास यातून उलगडणार आहे. आम्रपालीने अनुभवलेल्या भावना आणि सुखसोयींचा केलेला त्याग, एक बौद्ध भक्त म्हणून ब्रह्मचर्य स्वीकारून तिच्या या प्रवासाची गोष्ट यात आहे. याबाबत अंकिता म्हणाली की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मधील यमुनाबाईच्या भूमिकेसाठी माझं जगभरातून खूप कौतुक होत आहे. त्यामुळे काही महत्त्वपूर्ण भूमिकांच्या ऑफर्स येत आहेत. 'स्वातंत्र्यवीर सावरकर'नंतर 'आम्रपाली'मध्ये काम करायला मिळणं यासारखं सुख नाही. आम्रपाली माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज असेल असंही ती म्हणाली.

 

टॅग्स :अंकिता लोखंडे