Join us

‘लुका छुपी’ व ‘सोन चिरेय्या’च्या निर्मात्यांचाही पाकिस्तानला ‘दे दणका’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 3:19 PM

सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. बॉलिवूडमध्येही संतापाची लाट आहे. या हल्ल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी आपला चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे. होय, ‘टोटल धमाल’ प्रमाणेच क्रिती सॅनन व कार्तिक आर्यनचा ‘लुका छुपी’ आणि सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरेय्या’ हे दोन चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीत. या दोन्ही चित्रपटांच्या मेकर्सनी आपले चित्रपट पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.

  ‘सोन चिरैया’ हा चित्रपट चंबळच्या खोºयातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे.  इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे. ‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुकाछुपी’ हा नवा धमाकेदार चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बॉलिवूडमध्ये  तीव्र पडसाद उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी लादली आहे. फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने पाकी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.  म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी हटवली आहेत. यात पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा पाकी गायकांचा समावेश आहे. सलमान खान यानेही पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आतिफ असलमने गायलेले एक गाणे आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’मध्ये आतिफ असलमने गायलेले एक गाणे होते. हे गाणे गाळण्याचा आदेश सलमानने दिला आहे.

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाकार्तिक आर्यनक्रिती सनॉनसुशांत सिंग रजपूतअजय देवगण