रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ची (Ved) सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अगदी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. साहजिकच रितेश आणि जिनिलिया दोघंही जाम खुश्श आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून भाऊ अन् वहिनीसाहेब दोघंही भारावून गेले आहेत. ‘वेड’नंतर काय तर रितेशचं माहित नाही पण वहिनीसाहेबांचं मात्र ठरलंय. होय, ‘वेड’नंतर जिनिलिया नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. तिच्याकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत.तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘वेड’ या सिनेमाद्वारे रितेशने दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवलं. तर जिनिलियाने पहिल्यांदा मराठीत डेब्यू केला. ‘वेड’मधील जिनिलियाने साकारलेली श्रावणीची भूमिका प्रेक्षकांना जाम आवडली. आता तिच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. साहजिकचं चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
जिनिलियाने नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आगामी चित्रपटांबाबत भाष्य केलं आहे. जिनिलिया लवकरच दिग्दर्शक मानव कौल यांच्या नवीन चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं नाव तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण या आगामी सिनेमातील भूमिकेबाबत मात्र तिने सांगितलं आहे. या चित्रपटात जिनिलिया सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय एका दाक्षिणात्य चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव सध्यातरी तिने सांगितलेलं नाही.
जिनिलिया एक गुणी अभिनेत्री आहे. रितेशशी लग्न झाल्यानंतर काही वर्ष ती अभिनयापासून दूर होती. यादरम्यान ती दोन मुलांची आई झाली. मुलांच्या संगोपनात तिने स्वत:ला झोकून दिलं. पण यानंतर सुमारे १० वर्षांनी तिने कमबॅक केली.
याबद्दलही ती बोलली. माझं अभिनयावर प्रेम आहे. ब्रेक घेतल्यानंतर पहिल्या वर्ष मजेत गेलं. पण नंतर मला कंटाळा येऊ लागला. यादरम्यान मी गरोदर राहिले. पण नंतरच आईपण जगणं खूपच आनंदायी होतं. यानंतर अनेक वर्षांनी कमबॅक करण्याचा विचार केला तेव्हा मी जरा घाबरलेली होते. इतक्या वर्षानंतर लोक मला स्वीकारतील का, असं मला वाटायचं. पण सोबत यादरम्यान मला एक नवा दृष्टिकोन दिला. मला कशा भूमिका करायला आवडतील, मला कशा भूमिका हव्यात, याबद्दलची माझी जाण प्रगल्भ झाली.
‘तुझे मेरी कसम’, ‘जाने तू या जाने ना’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या बॉलिवूड चित्रपटातून जिनिलियाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘हॅपी’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘बोमारिलू’ या साऊथ चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला.