'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगलीच चर्चा आहे. गेल्या वर्षभरापासून 'छावा' सिनेमाच्या टीझर, ट्रेलर, गाण्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला होता. 'छावा' सिनेमाची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडली. याचाच परिणाम सिनेमा रिलीज झाल्यावर घडला. 'छावा' सिनेमा रिलीज होताच हाउसफुल्ल गर्दी झाली. प्रत्येक शिवप्रेमीच्या काळजाला स्पर्श करणाऱ्या 'छावा' सिनेमाचं खूप कौतुक होतंय. अशातच 'छावा' सिनेमा पाहून एका थिएटरमध्ये खास प्रसंग घडला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
'छावा' सिनेमा संपल्यावर थिएटरमध्ये काय घडलं?
सोशल मीडियावर एका पेजने व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत 'छावा' संपल्यावर सर्व प्रेक्षक आपापल्या जागेवर उठून उभे राहिले. अशातच प्रेक्षकांमधील एक पुढे येऊन "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय" अशी घोषणा करताना दिसतो. उपस्थित प्रेक्षक सुद्धा उभं राहून छत्रपती शिवराय अन् छत्रपती शंभूराजेंना मानवंदना देतात. "हर हर महादेव", "जय भवानी जय शिवाजी" च्या घोषणा थिएटरमध्ये दुमदुमतात. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. एकूणच 'छावा' सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच भिडलाय.
'छावा' सिनेमा रिलीज झाल्यावर विकीने प्रेक्षकांचे आभार मानणारी खास पोस्ट शेअर केलीय. विकी लिहितो की, "तुमच्या प्रेमाने 'छावा'ला खऱ्या अर्थाने जीवंत केलंय! तुमचे येणारे मॅसेज, फोन्स, छावा पाहताना तुम्ही शेअर करत असलेले व्हिडीओ.. मी सर्व पाहतोय. तुम्ही सर्वांनी इतकं भरभरुन प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप आभार. संभाजी महाराजांची शौर्यगाथा साजरी करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचे मी खूप आभार मानतो." असं कॅप्शन लिहून विश्वास आपका साथ हो, तो युद्ध लगे त्योहार! हा छावामधील संवाद शेवटी विकीने लिहिला.