वर्षभरापूर्वी रुग्णालयात बेवारस सोडल्यानंतर अंत्यसंस्काराकडेही मुलांनी फिरविली पाठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:02 PM
कमाल अमरोही यांच्या ‘पाकिजा’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या गीता कपूर यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता वृद्धाश्रमातच अखेरचा श्वास घेतला. ...
कमाल अमरोही यांच्या ‘पाकिजा’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या गीता कपूर यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता वृद्धाश्रमातच अखेरचा श्वास घेतला. निर्माता अशोक पंडित यांनी गीता यांच्या पार्थिवाचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. गीता या गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या. वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलाने त्यांना एका रुग्णालयात बेवारस स्थितीत सोडले होते. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणीही त्यांची अखेरपर्यंत विचारपूस केली नाही. अशोक पंडित यांनीच त्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आता तर त्यांच्या अंत्यसंस्काराकडेही मुलांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. याविषयी अशाके पंडित यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘त्यांचे पार्थिव विले पार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये दोन दिवस ठेवण्यात येईल. आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांची मुले कमीत कमी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी येतील. जर त्यांची मुले आलीच नाहीत तर आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या वर्षभरापासून त्या आपल्या मुलांची वाट पाहत आहेत. मात्र अखेरपर्यंत त्यांना कोणीही भेटण्यासाठी आले नाही. गेल्या शनिवारी आम्ही त्यांना खूश करण्यासाठी एका ग्रॅण्ड ब्रेकफास्टचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या ठिक दिसत होत्या, मात्र आनंदी नव्हत्या. कारण त्यांना त्यांच्या मुलांना बघायचे होते. ALSO READ : ‘पाकिजा’ अभिनेत्री गीता कपूरचे निधन; वृद्धाश्रमातच घेतला अखेरचा श्वास!वृत्तानुसार, गीता कपूर यांचा मुलगा बॉलिवूडमध्येच कोरिओग्राफर आहे, तर त्यांची मुलगी पूजा एक एअर होस्टेस आहे. अशोक पंडित आणि रमेश तौरानी यांनीच त्यांच्या उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती. हे दोघेही अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्याजवळ होते. गीता यांना गेल्यावर्षी मुलगा राजाने एका हॉस्पिटलमध्ये बेवारस स्थितीत सोडले होते. मिड डेच्या रिपोर्टनुसार, ‘त्यांचा मुलगा त्यांना दररोज मारहाण करायचा.’ गीता यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते की, ‘माझा मुलगा मला चार दिवसांमधून फक्त एकदा जेवण द्यायचा. त्याचबरोबर बºयाचदा तो मला घरातच कोंडून ठेवायचा. त्याने मला उपाशी ठेवले जेणेकरून मी आजारी पडणार आणि तो मला हॉस्पिटलमध्ये सोडून देणार. दरम्यान, अशाही स्थितीत गीता या अखेरपर्यंत आपल्या मुलांची वाट पाहत राहिल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तरी त्यांची मुले येणार काय? हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे.