अल्लाह के रास्ते से भटक गई थी... असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडले होते. आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने ‘अल्लाह’साठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे नाव म्हणजे सना खान. होय, ‘बिग बॉस 6’ आणि सलमान खानच्या ‘जय हो’ सिनेमात दिसलेली तीच ती चुलबुली सना खान.सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सनाने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. अल्लाह माझ्या या नव्या प्रवासात मला मदत करेल... मी अल्लाहच्या आदेशांचे पालन करेल, असे सनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
झाले होते ब्रेकअप
याच वर्षाच्या सुरुवातीला सना खानचे बॉयफ्रेन्ड मेलविन लुईससोबत ब्रेकअप झाले होते. यावेळी तिने मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते. त्याच्या बद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. आता या सर्व जुन्या पोस्ट तिने तिच्या अकाऊंटवरून डिलीट केल्या आहेत. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.
मी तोंड उघडले तर...! एक्स-बॉयफ्रेन्डच्या आरोपांवर सना खानचे उत्तर
-आणि स्टेजवर ढसाढसा रडली प्रेमभंग झालेली ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल
झायरानेही घेतला होता संन्यास
2019 मध्ये अभिनेत्री झायरा वसीम हिने धर्मासाठी बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता.‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’, असे सांगत झायराने आपला हा निर्णय चाहत्यांशी शेअर केला होता. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.