बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीय. सिनेमाची निर्माती प्रेरणा अरोरा आणि अभिषेक कपूरवर 16 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. केदारनाथ सुरुवातीपासूनच वादात अडकला आहे. यावेळी पद्मा फिल्म्सच्या अनिल गुप्ता यांनी आरोप लावला आहे.
रिपोर्टनुसार अनिल गुप्ता यांनी क्रिआर्ज एंटरटेनमेंट त्यांच्यासोबत 16 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तर क्रिआर्ज एंटरटेनमेंटने हे आरोप फेटाळून लावले आहेत. क्रिआर्ज एंटरटेनमेंटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला पत्रकात अनिल गुप्ता यांचे खोटे आरोप ऐकून आम्ही हैराण असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीपासूनच ‘केदारनाथ’च्या मार्गात एक ना अनेक अडचणी येत होत्या.
‘केदारनाथ’मध्ये सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.