Join us  

किस बाई किस! अगस्त्य नंदाने शाहरुखची लेक सुहानाला दिली फ्लाईंग किस, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 3:49 PM

अगस्त्य सुहाना गाडीपर्यंत सोडायला जातो. कारचा दरवाजा उघडतो अन्...

अलिकडेच फॅशन डिझायनर तानिया श्रॉफचा वाढदिवस होता, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार किड्स उपस्थित होते. शनाया कपूर, ओरी, खुशी कपूर, सुहाना खान, आर्यन खान, अगस्त्य नंदा हजर होते. बर्थडे पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि आता पार्टीतील एका व्हिडिओ सध्या सगळीकडे हेडलाईन बनला आहे. या व्हिडीओमध्ये अगस्त्य नंदा आणि सुहाना खान दिसतेय. अगस्त नंदा सुहाना खाससोबत डेब्यू करणार आहे. दोघे जोया अख्तरचा सिनेमा 'आर्चीज'मध्ये दिसणार आहेत. तानिया श्रॉफ ही सुनील शेट्टीचा लेक अहानची गर्लफ्रेंड आहे.  

सुहाना सोडायला गेला अगस्त्यव्हिडीओमध्ये शाहरुख खानची लाडकी लेक  तानियाच्या बर्थ डे पार्टीनंतर बाहेर येताना दिसेतय. तिच्यासोबत तानिया श्रॉफ, अहान आणि अगस्त्य नंदासुद्धा दिसतोय. अगस्त्य सुहाना गाडीपर्यंत सोडायला जातो. कारचा दरवाजा उघडतो आणि त्यानंतर सुहानाला फ्लाईंग किस देतो.  

 अगस्त्य आणि सुहानाच्या अफेअरची चर्चा याआधी सुद्धा झाली होती. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य हा राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा नातू आहे. हिंदुस्तान टाईम्सने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, कपूर कुटुंबाच्या या ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांना सुहानाची जोडीदार म्हणून ओळख करून दिली.

रिपोर्ट्सनुसार, या दोघांमधील नात्याची सुरुवात झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटाच्या सेटवर झाली. सूत्राने सांगितले की ते दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात आणि ते त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, दोघेही सध्या त्यांचे नाते अधिकृत करू इच्छित नाहीत.

टॅग्स :सुहाना खानअमिताभ बच्चनशाहरुख खान