चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि अष्टपैलू अभिनेता म्हणजे चंकी पांडे. 90 च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटविणार्या चंकी पांडेने गेल्या काही वर्षांत पूर्णपणे भिन्न पात्र साकारत पुन्हा एकदा स्वतः ला सिद्ध केले आहे. करियरमध्ये कितीही चढउतार आले, तरी तो डगमगला नाही. मोठ्या संघर्षानंतर त्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं आहे. अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणा-या चंकीच्या वाट्याला गंभीर भूमिका फार कमी आल्या. विविध भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनयक्षमता दाखवली असली तरी विनोदी अंदाजामुळे त्याला इतरांप्रमाणे पाहिजे तसे यश मिळाले नाही.
स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकालाच आपल्या करिअरच्या सुरुवातीला स्ट्रगल करावा लागला आहे. तसाच स्ट्रगल हा चंकीच्याही वाट्याला आला नवभारत टाईटाइम्सशी बोलताना चंकी पांडेने आपला आतापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक रंजक किस्सेही सांगितले.
चंकी पांडेने सांगितले की सुरूवातीपासून त्याला सिनेमा पाहण्याचे वेड होते. सध्या कोविडमुळे चित्रपटगृह बंद आहेत, त्यामुळे सिनेमा पाहणे खुप मिस करतो, जेव्हा चित्रपटगृह उघडतील तेव्हा पुन्हा सिनेमा पाहण्याचा आनंद लुटणार असल्याचे सांगितले.
'शोले' सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता त्याच्या दुसर्याच दिवशी मिनर्वा चित्रपटगहात चंकीने सिनेमा पाहिला होता. ब्लॅकमध्ये तिकीट खरेदी करून सलग शोलेचे दोन शो पाहिले होते. शोलेनंतर अमिताभ बच्चन यांचा 'मुकद्दर का सिकंदर, 'डॉन' हे सिनेमेही चित्रपटगृहातच पाहिले आहेत. विशेष म्हणजे राजेश खन्ना यांचा 'हाती मेरे साथी' सिनेमा तब्बल 20 वेळा पाहिला असल्याचे चंकीने सांगितले.
चंकी पांडेने धर्मेंद्र आणि संजय दत्त सोबत 'खतरों के खिलाडी' सिनेमात काम केले होते. तो सिनेमाही चंकीने चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहिला होता. त्यावेळी सिनेमात काही फायटिग सीन होते. ते सुरू असतानाच चित्रपटगृहात एकाने “अरे धरम जी, चंकी पांडेला अजून थोडा मारा” असे जोरजोराने ओरडायला सुरूवात केल्याची आठवण सांगितली. सिनेमा पाहाता यावा यासाठी एकदा शाळेत जात असल्याचे सांगून सिनेमा पाहण्यासाठी चंकी गेला होता. तेव्हा अचानक मध्यंतरामध्ये अनाऊंसमेंट करण्यात आली ''चंकी तुम्ही सिनेमागृहात असाल तर तातडीने बाहेर जा, तुमची आई वाट पाहत आहे''.
चंकी पांडे यांनी सांगितले की एकदा 'एंटर द ड्रॅगन' सिनेमा बघायला गेलो होतो. हा अडल्ट सिनेमा होता आणि तेव्हा फक्त 13 वर्षांचा होता. अशा परिस्थितीत तो सिनेमा पाहण्यासाठी बुरखा घालून सिनेमागृहात एंट्री केली होती.
चंकी पांडे मराठी सिनेमातही झळकला आहे. 'विकून टाक' या सिनेमात चंकी पांडेने महत्वाची भूमिका साकारतली आहे. चंकी पांडेनंतर त्याची लेकदेखील बॉलिवूडमध्ये झळकत आहे. अनन्या पांडेने देखील अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करताना रसिकांची पसंती मिळवायला सुरूवात केली आहे.