Join us

साजिद नाडियादवालाच्या चित्रपटात झळकणार अहान शेट्टी, शूटिंग लवकरच होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 17:56 IST

साजिद नाडियादवाला यांच्या चित्रपटात अहान शेट्टी झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी सध्या चर्चेत आलाय. साजिद नाडियादवाला यांच्या चित्रपटात अहान शेट्टी झळकणार आहे. याची घोषणा साजिद नाडियादवाला यांनी अहान शेट्टीच्या (28 डिसेंबर) वाढदिवशी केली. साजिद नाडियादवालाने अहान शेट्टीसाठी खास पोस्टही शेअर केली.

इन्स्टाग्रामवर साजिद नाडियाडवाला यांनी अहानसोबतचा फोटो शेअर केला. त्यांनी लिहले, 'प्रिय अहान, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटवस्तू देण्यासाठी पुढील महिन्यापर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही. कारण मी याबद्दल खूप उत्सुक आहोत. आता हा माईलस्टोन गाठण्यासाठी एका नवीन प्रवासावर निघालो आहोत'.

अहानसोबत या सिनेमात मुख्य अभिनेत्री कोण आहे, हे अद्याप ठरलेले नाही. तर अहान शेट्टीने 'तडप' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील अहानच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारियाही मुख्य भूमिकेत होती. याचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले होते. 

 काही दिवसांपुर्वी अहान त्याच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आला होता. अहान आणि तानिया श्रॉफ 11 वर्षे ११ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही लहानपणापासून एकत्र शिकले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण आता हे जोडपे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे.  तान्या एक फॅशन डिझायनर आहे आणि त्याचे पालक जयदेव आणि रोमिला श्रॉफ हे उद्योगपती आहेत. 

टॅग्स :अहान शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटी