Join us

Pathaanच्या रिलीज आधी शाहरुखनं सांगितलं २० वर्षे लहान दीपिकासोबतच्या रोमांसबद्दल, म्हणाला- '...अंकल'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 4:33 PM

Deepika Padukone And Shahrukh Khan's Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खान(Shahrukh Khan)च्या 'पठाण' (Pathaan Movie) या चित्रपटाची लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. १० जानेवारीलाच या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. दरम्यान, किंग खान आणि दीपिकाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खरंतर हा व्हिडिओ २००७ सालचा आहे जेव्हा दीपिकाचा पहिला चित्रपट 'ओम शांती ओम' रिलीज झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख आणि दीपिका दिग्दर्शक फराह खानसोबत करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण'मध्ये पोहोचले होते.

व्हिडीओमध्ये करण जोहर दीपिकाला विचारतो की, 'तू शाहरुखला ७-८ वर्षांची असल्यापासून पाहत असशील ना?' शाहरुख म्हणाला की, कधीकधी दीपिका मला शूटवर म्हणायची, 'आय लव्ह यू अंकल. तर, दीपिकाने शाहरुखसोबतचा तिचा पहिला चित्रपट करण्याचा अनुभवही शेअर केला. दीपिकाने सांगितले की, शाहरुख प्रत्येक सीनपूर्वी माझ्यासोबत रिहर्सल करायचा. इतकंच नाही तर शूटिंग नसलेल्या दिवशीही तो माझ्यामुळे सेटवर यायचा. दीपिका आणि शाहरुखच्या वयात २० वर्षांचे अंतर आहे. किंग खान ५७ वर्षांचा आहे, तर दीपिका ३७ वर्षांची आहे. दीपिकाने २००७ साली शाहरुखसोबत 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

लवकरच दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानची जोडी 'पठाण' चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये 'पठाण'बद्दलची उत्सुकता पूर्वीपेक्षा अधिकच वाढली आहे. 'पठाण'मध्ये दीपिका आणि शाहरुखशिवाय जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पठाण'नंतर शाहरुख 'जवान' आणि 'डंकी' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. तर दीपिका पठाण शिवाय हृतिक रोशनसोबत 'फाइटर' आणि प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानदीपिका पादुकोणपठाण सिनेमा