1982 साली दूरदर्शनवर व्हीक्स कफ ड्रॉप्सची एक जाहिरात झळकायची. या जाहिरातीतील चिमुरडी तेव्हा फक्त 3 वर्षांची होती. तिच्या गोड चेह-याने सगळ्यांना वेड लावले होते. आता ही चिमुरडी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिचे नाव काय तर ईशिता अरूण. होय, सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका इला अरूण यांची लेक ईशिता अरूण.
शाळेत शिकत असतानाच ईशिताने नादिरा बब्बर यांच्या अॅक्टिंग वर्कशॉप मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. श्याम बेनेगल यांच्या यात्रा मालिकेतून तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली.
2002 साली वैशाली सामंत हिने गायलेले ‘ऐका दाजीबा’ हे गाणे खूप हिट ठरले होते. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि ईशिता अरुण हे कलाकार झळकले होते. ईशीताला या गाण्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या एका गाण्यामुळे हिट मिळालेली ईशीता सोनू निगमच्या ‘मौसम’ या अल्बममधूनही झळकली होती.
2005 साली ईशिता ध्रुव घाणेकर सोबत विवाहबंधनात अडकली. ध्रुव घाणेकर हा बॉलिवूड गायक आहे शिवाय शास्त्रीय आणि जॅझ फॉर्म मध्येही अनेक स्टेजवर तो परफॉर्मन्स करतो.ध्रुव घाणेकर हा दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. गिरीश घाणेकर यांनी वाजवा रे वाजवा, रंगत संगत, नवसाचं पोर यासारखे अनेक मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ९० च्या दशकातील त्यांची ‘गोट्या’ ही मालिका देखील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.
ईशिता सध्या इंडस्ट्रीत फारशी अॅक्टिव्ह नाही. सध्या ती आपल्या संसारात आनंदी आहे.