अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील मोस्ट हॅपनिंग कपल पैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला जवळपास 13 वर्षे झाली आहेत. ऐश्वर्याच्या आधी अभिषेकच्या आयुष्यात करिश्मा कपूर होती. दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतं होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता.
मात्र काही दिवसांनी दोघांनी आपलं रस्ते वगळे केले. करिश्मा कपूरशी साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात दीपनिता शर्मा या मॉडेल- अभिनेत्रीची एंट्री झाली होती. असंभव, कोई आप सा सारख्या सिनेमात दीपनिताने काम केले आहे. दोघांनी ओळख सोनाली बेंद्रेने करुन दिली होती.
रिपोर्टनुसार दीपनिता आणि अभिषेक एकमेकांना 10 महिने डेट करत होते. अभिषेक दीपनिताच्या प्रेमात वेडा झाला होता. अभिषेकने दीपनितासोबतचे रिलेशनशीप मीडियापासून नेहमीच लपवून ठेवले. दीपनिताने अभिषेकच्या बर्थ डे निमित्त पार्टी ठेवत होती, मात्र अभिषेकने त्या पार्टीत येण्यास नकार दिला. कारण त्याचवेळी अभिषेक ऐश्वर्या रायकडे आकर्षित होत होता. त्यानंतर अभिषेकने दीपनिताला इग्नोर करायला सुरुवात केली आणि दोघांचे ब्रेकअप झाले.