Join us

​‘पद्मावती’साठी ऐश्वर्या राय अन् सलमान खानने दिला होता होकार, पण....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 8:53 AM

‘पद्मावती’ हा पीरियड ड्रामा पडद्यावर पाहण्यास आम्ही-तुम्ही सगळेच उत्सूक आहोत.  दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर हे तिघे ...

‘पद्मावती’ हा पीरियड ड्रामा पडद्यावर पाहण्यास आम्ही-तुम्ही सगळेच उत्सूक आहोत.  दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर हे तिघे यात लीड रोलमध्ये आहेत. ‘पद्मावती’ हा संजय लीला भन्साळी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. खरे सांगायचे तर ‘पद्मावती’ची कथा गेल्या अनेक वर्षांपासून भन्साळींच्या डोक्यात होती. विशेष म्हणजे, सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांना घेऊन त्यांना हा चित्रपट बनवायचा होता. म्हणजेच सलमान व ऐश्वर्या ही भन्साळींची पहिली चॉईस होती. खरे तर सलमान व ऐश्वर्याने या चित्रपटासाठी होकारही दिला होता. पण ऐनवेळी ऐश्वर्याने भन्साळींसमोर एक अट ठेवली अन् या एका अटीमुळे पुढचा सगळा खेळ बिघडला. सलमान व ऐश्वर्याला घेऊन हा चित्रपट बनू शकला नाही आणि हे दोघे नाही म्हटल्यावर भन्साळींनी रणवीर व दीपिकाची निवड केली.ALSO READ : ​रणवीर सिंहचे ‘हे’ वागणे दीपिका पादुकोणला जराही आवडले नाही!ज्या काळात भन्साळींना ‘पद्मावती’ बनवायचा होता, नेमक्या त्याचकाळात ऐश्वर्या व सलमान यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. मग काय, ऐश्वर्याने भन्साळींसमोर अट ठेवली. सलमानने अला्द्दीन खिल्जीची भूमिका साकारली तरच मी हा चित्रपट करेल, ही ती अट होती. असे झाले असते तर सलमान व ऐश्वर्याचा एकही सीन यात नसता आणि ऐश्वर्याला नेमके हेच हवे होते. पण सलमानने ही अट मानण्यास नकार दिला. मग काय, चर्चा फिस्कटली अन् बॉलिवूडच्या या सर्वाधिक चर्चित कपलसोबत ‘पद्मावती’ बनता बनता राहिला. त्यामुळेच आता हा चित्रपट दीपिका व रणवीरसोबत आपल्याला बघावा लागतोय. आता भन्साळींच्या या चित्रपटात पद्मावतीची  भूमिका दीपिका पादुकोण साकारतेय. तर रणवीर सिंह अलाऊद्दीन सिद्दीकी याच्या भूमिकेत आहे. म्हणजेच, यात दीपिका व रणवीर या लव्हबर्ड्सचा एकही सीन नसणार आहे.