सलमान खाननंतर ऐश्वर्या राय बच्चनही करणार चित्रपटात डबल रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 6:01 AM
ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट फन्ने खांला घेऊन चर्चेत आहेत. मात्र आता अशी माहिती आहे की आणखीन ...
ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिचा आगामी चित्रपट फन्ने खांला घेऊन चर्चेत आहेत. मात्र आता अशी माहिती आहे की आणखीन दोन चित्रपट ऐश्वर्याच्या हाती लागले आहेत. 1967 च्या रात और दिन चित्रपटाचा रिमेक बनतो आहे ज्यात ऐश्वर्या अभिनय करताना दिसणार आहे. सत्येन बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रदीप कुमार, नर्गिस आणि फिरोज खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. यात नर्गिस यांनी मल्टी पर्सनालिटी डिसऑर्डर पीडित रुग्णाची भूमिका साकारली होती. हा एका थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये नर्गिस यांची भूमिका ऐश्वर्या साकारते आहे. निर्माती प्रेरणा अरोराला ऐश्वर्याला घेऊन एक चित्रपट तयार करायचा आहे ज्यात ऐशचा डबल रोल असणार आहे. चित्रपटाबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगची तयारी जोरात सुरु आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार ऐश्वर्याने या चित्रपटासाठी होकार सुद्धा दिला आहे. लवकरच ऐश्वर्याचा फन्ने खां हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. ‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. ALSO RAED : SEE PICS : एक क्षणही अभिषेकला दूर करायला तयार नव्हती ऐश्वर्या राय बच्चन!!काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींच्या डिनर पार्टीत आपल्या हटके स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ऐशने या परिधान केलेल्या ड्रेसचे नाव होते गोल्डन सिमिर. हा ड्रेस ८५ टक्के पॉलिस्टर असून, १५ टक्के सिल्क आहे. या ड्रेसला गाउन असेही म्हटले जाते .या ड्रेसची किंमत तीन लाख ७३ हजार ९०५ रुपये इतकी आहे. बच्चन परिवाराची सून असलेल्या ऐश्वर्यासाठी ही किंमत फारशी नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.