Join us

'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 09:22 IST

ऐश्वर्या आणि आराध्याला त्यांच्या ड्रेसिंग सेन्सवरुनही नेटकरी ट्रोल करत आहेत.

सध्या बच्चन कुटुंब चांगलंच चर्चेत आहे. अभिषेक-ऐश्वर्यामध्ये आलेला दुरावा, ऐश्वर्या आणि आराध्याचं बच्चन कुटुंबापासून लांब राहणं हे सगळंच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यातच ऐश्वर्या जिथे जाईल तिथे लेक आराध्या असतेच. मायलेकींना त्यांच्या फॅशन ड्रेसिंग सेन्सवरुनही खूप ट्रोल केलं जातं. नुकतंच महिला पत्रकाराने ऐश्वर्याला आराध्यावरुन प्रश्न विचारला. त्यावर ऐश्वर्यानेही थेट उत्तर दिलं.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नुकतीच लेक आराध्यासह (Aaradhya)अबु धाबी येथे झालेल्या आयफा(IIFA) पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचली. यावेळी माध्यमांसमोर पोज दिल्यानंतर एका महिला पत्रकाराने तिला आराध्याविषयी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. आराध्याचं नाव ऐकताच ऐश्वर्या मुद्दामून थांबली आणि तिने प्रश्न नीट ऐकला. पत्रकाराने विचारलं, 'आराध्या नेहमीच तुझ्यासोबत दिसते. ती आतापासूनच सर्वात बेस्ट व्यक्तीकडून शिकत आहे.' यावर ऐश्वर्या उत्तर देत म्हणते, 'ती माझी मुलगी आहे. ती नेहमीच बेस्ट आहे.'

दोघी मायलेकी हसत तिथून निघून जातात. या सोहळ्यासाठी ऐश्वर्याने गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेला ब्लॅक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तर आराध्याच्या व्हाईट जॅकेटने लक्ष वेधलं आहे. त्यांचा ड्रेसिंग सेन्स पाहून नेटकरी म्हणतात,  'दोघीही जादूगारासारखं का आल्या आहेत?', 'ऐश्वर्याने डिझायनर बदलले पाहिजे', 'बिचाऱ्या मुलीला काय मायकल जॅक्सन बनवले आहे'. अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी बच्चन मायलेकींना जबरदस्त ट्रोल केलं आहे. 

ऐश्वर्या काही दिवसांपूर्वीच दुबईला साऊथ सिनेमांच्या पुरस्कार सोहळ्याला गेली होती. तिथेही आराध्या तिच्यासोबत होती. शिवाय नुकत्याच झालेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये मायलेकी सोबत दिसल्या होत्या. यावरुन आराध्या शाळेत जात नाही का? म्हणत ट्रोल करण्यात आलं होतं.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनआयफा अॅवॉर्डट्रोलसोशल मीडियाबॉलिवूड