९०च्या दशकात अभिनय आणि सौंदर्याने भुरळ घालणारी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन पन्नाशीतही कित्येकांच्या काळजाचा ठोका चुकवते. बच्चन घराण्याची सून असलेली ऐश्वर्या कायमच चर्चेत असते. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ऐश्वर्या अनेक ब्रँडचा चेहरादेखील बनली आहे. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या संपत्तीच्या बाबतीतही वरचढ ठरली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री बनली आहे. सियासतने दिलेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या बच्चनने संपत्तीच्या बाबतीत प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, करीना कपूर, माधुरी दीक्षित यांना मागे टाकलं आहे. भारतातील टॉप १० श्रीमंत अभिनेत्रींची यादी समोर आली आहे. यामध्ये ऐश्वर्या अग्रस्थानी आहे. या लिस्टमध्ये नयनतारा १०व्या स्थानावर आहे. नयनतारा १०० कोटींची मालकीण आहे.
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनच्या नावावर तब्बल ८०० कोटींची संपत्ती आहे. दरम्यान, ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यांना आराध्याही मुलगी आहे. मध्यंतरी ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, त्यानंतर ऐश्वर्या-अभिषेक एकत्र पार्टीत दिसले होते. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.