ऐश्वर्या राय बच्चन बनणार का सरोगेट मदर?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 10:38 AM
ऐश्वर्या राय बच्चन हिचे स्टार्स सध्या जोरावर आहेत, असेच म्हणायला हवे. कारण नवे वर्षे ऐश्वर्यासाठी बरेच बिझी असणार आहे. ...
ऐश्वर्या राय बच्चन हिचे स्टार्स सध्या जोरावर आहेत, असेच म्हणायला हवे. कारण नवे वर्षे ऐश्वर्यासाठी बरेच बिझी असणार आहे. होय, या वर्षात ‘फन्ने खां’, ‘रात और दिन’चा रिमेक आणि याशिवाय आणखी एक थ्रीलर चित्रपट असे एकूण तीन मोठे सिनेमे आहेत. आता ऐश्वर्याच्या हाती आणखी एक मोठा सिनेमा लागल्याची खबर आहे. होय, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’चे दिग्दर्शक नारायण सिंह यांच्या नवा चित्रपटात ऐश्वर्याची वर्णी लागल्याचे कळतेय. या चित्रपटाचे नाव आहे ‘जॅसमिन’. या चित्रपटात ऐश्वर्या एका सरोगसी मदरची भूमिका साकारताना दिसू शकते. नारायण सिंह यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. हा चित्रपट एक रिअल लाईफ कथा आहे. गुजरातच्या एका महिलेच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला असेल. या महिलेला मुलं हवं असतं. याच इच्छेतून ती दुसºया एका जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेतले. पण बाळाच्या जन्मानंतर ती त्याच्यात अशी काही गुंतते की त्याला पुन्हा मिळवणे, हेच तिचे ध्येय बनते, अशी ही कथा आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्या ही आमची पहिली पसंत आहे. मात्र अद्याप तिने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. तिच्या डेट्सवर सगळे अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास काहीही फायनल झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.लवकरच ऐश्वर्याचा‘फन्ने खां’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत.‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वयार्ची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे.