Join us  

Aishwarya Rai : चित्रपट नाही म्हणून काय झालं, कंपनीच्या CEOपेक्षाही बक्कळ कमावते ऐश्वर्या राय...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 10:36 AM

Aishwarya Rai Bachchan Net Worth : ऐश्वर्या आताश: मोजक्या चित्रपटात दिसते. पण अतिशय अलिशान व विलासी आयुष्य जगते. यामागे ‘बच्चन’ची पुण्याई आहे, असं तुम्हाला वाटेल. पण हे खरं नाही. कारण ऐश्वर्या स्वत: कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

Aishwarya Rai Bachchan Birthday :  बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai ) आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करतेय. आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी ऐश्वर्या आताश: मोजक्या चित्रपटात दिसते. पण अतिशय अलिशान व विलासी आयुष्य जगते. यामागे ‘बच्चन’ची पुण्याई आहे, असं तुम्हाला वाटेल. पण हे खरं नाही. कारण ऐश्वर्या स्वत: कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. होय, कारण ऐश्वर्या फक्त अभिनेत्री नाही तर यशस्वी बिझनेसवुमन आहे. त्यामुळेच हातात कोणताही सिनेमा नसताना देखील ती बक्कळ कमाई करते.

ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या हायेस्ट पेड अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी ती 10 ते 12 कोटी रूपये मानधन घेते. मानधनाचा आकडा तिच्या भूमिकेवर अवलंबून असतो. पण आधी म्हटल्यानुसार, ऐश्वर्या एक सक्सेसफुल बिझनेसवुमन आहे. तिने अनेक स्टार्टअप्समधअये करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. Ambee नावाच्या कंपनीत तिने सुमारे एक कोटींची गुंतवणूक केली आहे. हेल्थकेअर स्टार्टअप पॉसिबलमध्येही तिची गुंतवणूक आहे. एक ना अनेक स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये तिची गुंतवणूक आहे. अनेक कंपन्यांसाठी ब्रँड एम्बेसेडर म्हणून तिने काम केलं आहे, करते आहे.  मुंबईतील वांद्रे येथे तिचा आलिशानं बंगला आहे. दुबईमध्येही तिनं आलिशान घर खरेदी केलं आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या एकूण 775 करोड रुपयांची मालकीण आहे. दरवर्षी ब्रँड एंडोर्समेंट्समधून ती सुमारे 80-90 कोटी कमावते. तिची एक दिवसाची कमाई 6 ते 7 कोटी रूपये आहे. ऐश्वर्याने रिअल इस्टेटमध्येही चांगली इव्हेस्टमेंट केली आहे. त्यातूनही तिच्याकडे महिन्याला लाखो रुपये येत असतात. 

ऐश्वर्या अलिशान गाड्यांची मालकीण आहे. तिच्याकडे एक शानदार रोल्स रॉयस घोस्ट आहे, या गाडीची किंमत 7.95 कोटी आहे. याशिवाय  1.60 कोटी रुपयांचीमर्सिडीज बेंझ एस 350 डी कूप,  ऑडी ए8एल लेक्सस एलएक्स 570 आणि 1.58 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ एस500 तिच्या मालकीची आहे.  2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. लग्नानंतरही काही वर्ष ऐश्वर्या काम करत होती.मात्र त्यानंतर लेकीच्या जन्मानंतर ऐश्वर्याचा इंडस्ट्रीतील वावर कमी झाला. त्यानंतर मात्र ती अनेक जाहिरातीमध्ये काम करताना दिसली.   

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी