दोन वर्षांच्या ब्रेकनंतर अभिषेक बच्चनने 'मनमर्जिया' सिनेमातून पुनरागमन केले आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमाला समीक्षकांचीदेखील पसंती लाभली आहे. एका इव्हेंट दरम्यान अभिषेक बच्चनने आपल्या करिअर आणि सिनेमांबाबत आपलं म्हणणे मांडले.
यावेळी अभिषेकला दिग्दर्शनक्षेत्रात येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिषेक म्हणाला सध्या मला अभिनयावर फोकस करायचे आहे. मात्र त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनला दिग्दर्श करायचे आहे. अभिषेकने सांगितले की शूटिंग दरम्यान ऐश्वर्या मेकिंगच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देते. सिनेमाच्या शॉटला घेऊन ती खूप अलर्ट असते. शॉट संपल्यानंतर तो नीट झाला आहे की नाही ते ती तपासून बघते.
अनेक वर्षानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'गुलाब जामून' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'गुलाब जामून' सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. याआधी या जोडीने गुरू', 'उमराव जान', 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण' व 'सरकार राज' सारख्या सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. गुलाब जामून चित्रपटाच्या निमित्ताने या 'रिअल लाईफ' कपलला 'रिल लाईफ'मध्ये पुन्हा एकदा रोमान्स करताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या दोघांना इतक्या वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.