Join us

मुलगी आराध्यावरून सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनला केले ट्रोल, लोकांनी केल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:49 PM

सोशल मीडियावर सेलिब्रेटी ट्रोल होतात, ही काय नवीन गोष्ट नाही. या गोष्टीला नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला जावे लागले.

सोशल मीडियावर सेलिब्रेटी ट्रोल होतात, ही काय नवीन गोष्ट नाही. या गोष्टीला नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला जावे लागले. तिच्यासोबत देखील हे पहिल्यांदा झाले नाही तर याआधी तिला जाडेपणावरून ट्रोल केले होते.

नुकतेच बच्चन कुटुंब फॅमिली डिनरसाठी बाहेर गेले होते आणि यावेळी ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्याचा हात पकडला होता. त्यावरून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरूवात केली. कारण ऐश्वर्या नेहमी आराध्याचा हात पकडून ठेवते.

लोकांनी कमेंट केली की, तिने आता आराध्याचा हात पकडणे सोडले पाहिजे कारण आता ती तीन वर्षांची छोटी मुलगी नाही.

काही लोकांनी या फोटोंवर कमेंट करत लिहिले की, आशा करतो की नेहमी अशा पोजिशनमध्ये राहिल्यामुळे ऐश्वर्याच्या मुलीचा हात दुखत नसेल. 

तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, ऐशची ही अंबिलिकल कार्ड (गर्भनाळ) कापली पाहिजे कारण आता ती आठ वर्षांची आहे. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, कृपया तिचा हात सोडा ऐश आणि तिला आरामात चालू द्या. 

ऐश्वर्या राय बच्चनला आराध्यावरून ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाही आहे. यापूर्वी ऐश्वर्याने सांगितले होते की, फोटोग्राफर्स फोटो घेण्यासाठी मागे धावतात. इतकेच नाही तर लोकांवर पडतात. अशात आई असल्याच्या नात्याने आराध्याची ती काळजी घेणार आणि त्या लोकांना या गोष्टीचा त्रास होतो. त्यांनी आपली सहानुभूती स्वतःकडेच ठेवावी.

ऐश्वर्याच्या कामाबद्दल सांगायचे तर ऐश्वर्या शेवटची अतुल मांजरेकर यांच्या फन्ने खां चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अनिल कपूर व राजकुमार राव सोबत दिसली होती. या चित्रपटात तिने सुपरस्टार बेबी सिंगची भूमिका केली होती. तिला कॅब ड्रायव्हर (अनिल कपूर) आणि त्याचा मित्र (राजकुमार राव) किडनॅप करतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या लवकरच तिचा नवरा अभिषेक बच्चनसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव गुलाब जामुन असे आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन