Join us

इन्स्टाग्रामवर एंट्री करताच यामुळे नाराज झाली ऐश्वर्या राय-बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 3:33 PM

ऐश्वर्या राय-बच्चनने इन्स्टाग्रामवर एंट्री करून काही तास उलटत असतानच ती नाराज झाल्याचे समजते. आपल्या फ्लॉप इन्स्टा डेब्यूमुळे ती नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र ही चर्चा तिच्या धमाकेदार इन्स्टा डेब्यूमुळे नसून, फ्लॉप डेब्यूमुळे रंगत आहे. होय, ऐशचा सोशल मीडिया डेब्यू सपशेल फ्लॉप ठरला आहे. वृत्तानुसार अशी चर्चा रंगत आहे की, ऐशचा डेब्यू कॅटरिनाच्या तुलनेत खूपच कमकुवत ठरला आहे. कारण कॅटप्रमाणे तिच्या डेब्यूची तेवढी चर्चाही रंगली नसून, फॉलोअर्सची संख्याही कोटीमध्ये पोहोचली नाही. एवढेच काय तर अद्यापपर्यंत तिचे अकाउंट व्हेरीफायदेखील केले गेले नाही. आतापर्यंत ऐश्वर्याला केवळ एक लाख ३० हजार लोकांनीच फॉलो केले आहे. ALSO READ : अखेर ऐश्वर्या राय-बच्चनची इन्स्टाग्रामवर एंट्री; सर्वात अगोदर ‘या’ सेलिब्रिटीने केले तिला फॉलो!आपल्या चाहत्यांच्या विनंतीनंतर ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर डेब्यू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आपल्या सोशल मीडिया डेब्यूमुळे स्वत: ऐशदेखील फारशी खूश नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश फ्लॉप इन्स्टाग्राम डेब्यूमुळे आपल्या सोशल मीडिया टीमवर नाराज आहे. पिंकविलाने ऐशच्या अत्यंत जवळच्या सूत्राचा हवाला देताना लिहिले की, ‘ऐश्वर्या राय-बच्चनने असे गृहीत धरले नव्हते. कारण डेब्यूच्या सहा तासांनंतर तिला केवळ २० हजार फॉलोअर्स जोडता आले. त्यामुळे ती खूपच निराश झाली आहे. त्याचबरोबर ती यामुळेही नाराज आहे की, तिचे अकाउंट अद्यापपर्यंत व्हेरिफाइडही केले गेले नाही.  दरम्यान, ऐशने इन्स्टावर डेब्यू केल्यानंतर आपल्या मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या व्यतिरिक्त ऐशने शनिवारीच आणखी एक फोटो पोस्ट केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, ‘लाइटमध्ये असल्याचा विचार करा’ दरम्यान, ऐश लवकरच कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखविताना दिसणार आहे. या व्यतिरिक्त ऐश अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याबरोबर ‘फन्ने खां’ या चित्रपटातही झळकणार आहे.