Join us

अमिताभ बच्चन यांच्यासाठी ऐश्वर्याची पोस्ट, आराध्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 10:52 IST

ऐश्वर्या राय बच्चनने अमिताभ बच्चन यांचा आराध्याबरोबरचा एक फोटो शेअर केला.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी ११ ऑक्टोबरला वयाची  82वर्ष पूर्ण करत आहेत. या खास निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहतेच नव्हे तर, मनोरंजन विश्वातील कलाकार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी देखील अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनेही सासरे अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

ऐश्वर्या राय बच्चनने अमिताभ बच्चन यांचा आराध्याबरोबरचा एक फोटो शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, "हॅप्पी बर्थडे पा-दादाजी, देव तुम्हाला आशीर्वाद देवो". विशेष म्हणजे ऐश्वर्याने ही पोस्ट शुक्रवारी मध्यरात्री वाढदिवस संपण्याच्या काही वेळाआधी केली. तसेच जवळपास 6 महिन्यांनंतर ऐश्वर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. इतक्या काळानंतर ऐश्वर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसानिमित्त जलसाच्या बाहेर चाहत्यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या ब्लॉगवर अनेक फोटो शेअर केले आहेत. हे. बिग बी यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. शिवाय बिग बींची एक झलक पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चन