बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती इंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी चर्चेत येत असते. ऐश्वर्या स्क्रीनवर इंटिमेट सीन करणे टाळते. मात्र, तिने 'धूम २' (Dhoom 2) चित्रपटात हृतिक रोशनसोबत किसिंग सीन दिला होता. इंटिमेट आणि किसिंग सीनबाबत अभिनेत्रीने अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
फिल्मफेअरच्या एका मुलाखतीत ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली की, माझे भविष्य कोणीही ठरवणार नाही. ब्रँडच्या स्क्रिप्टमध्ये एक किस होते, मी त्याला ते काढण्यास सांगितले. शब्द चित्रपटातही मी कोणतीही किस केली नव्हती. त्यात एक इंटिमेट सीन चित्रित करण्यात आला होता, जो आम्ही वेगळ्या पद्धतीने शूट केला आहे. मी स्पर्श न करता इंटिमेट सीन द्यायला तयार होते. माझ्यासोबत किसबद्दल किती चर्चा होईल हे मला माहीत होतं. मी एक स्वतंत्र अभिनेत्री आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे कपडे काढा किंवा तुमची लाज सोडून द्या.
'धूम २'मध्ये ऐश्वर्याने का दिला होता किसिंग सीन?ऐश्वर्याने धूम २ साठी किसिंग सीन का दिला होता, याबद्दलचा खुलासा केला होता. अभिनेत्री म्हणाली होती की, त्या चित्रपटाच्या वेळेपर्यंत किसिंग सीन सामान्य झाले होते. तो सीनही बदलत्या काळानुसार चित्रित करण्यात आला. जेव्हा तो सीन शूट झाला तेव्हा तो केवळ रोमँटिक सीन नव्हता तर त्यात संवादही होते. पार्श्वभूमीला एखादं गाणं होतं आणि आम्ही नुसतं किस करत होतो असे नाही.
ऐश्वर्याला मिळाली होती कायदेशीर नोटीसडेली मेलशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती की, मी 'धूम २' चित्रपटात किसिंग सीन दिला होता. त्यावर खूप चर्चा झाली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला देशातील काही लोकांकडून कायदेशीर नोटिसा मिळाल्या होत्या. त्याच्यात असे म्हटले होते की, तू प्रतिष्ठित आहेस, तू आमच्या मुलींसाठी एक उदाहरण आहेस, तुला पडद्यावर अशा दृश्यांमध्ये पाहणे आम्हाला योग्य वाटत नाही. मग तू ते का केले? आणि माझे म्हणणे होते की मी एक अभिनेत्री आहे आणि मी माझे काम करत आहे आणि लोक मला काही सेकंदांबाबत स्पष्टीकरण विचारत आहेत. ऐश्वर्याने सांगितले होते की, चित्रपटात किस करताना ती फारशी कम्फर्टेबल नव्हती.