ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. मग ते तिचे फिल्मी करिअर असो किंवा मग खासगी आयुष्य. ऐश्वर्याचे इंडस्ट्रीतल्या सगळ्यांसोबत खूप चांगले नाते आहे. यात रेखा यांचाही समावेश होतो. ऐश्वर्या आणि रेखा दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डींग आहे. एका अॅवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्याने चक्क रेखाला ''रेखा माँ'' म्हणून संबोधले होते.
तेव्हापासून रेखा आणि ऐश्वर्याच्या बॉन्डींगच्या चर्चा जास्त रंगायला लागल्या.विशेष म्हणजे या अवॉर्डशोमध्ये ऐश्वर्याला 'जज्बा 'या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. ऐश्वर्याला हा पुरस्कार रेखा यांच्या हस्ते देण्यात आला होता.
रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना ऐश्वर्याने म्हटले होते की, हा पुरस्कार मला माझ्या आईकडून मिळाला आहे. यापेक्षा महत्वाचा क्षण माझ्या आयुष्यात दुसरा काय असू शकतो, हा माझ्यासाठी बहुमानच आहे. यावर रेखानेही उत्तर देताना म्हटले होते की, असे अनेक पुरस्कार तुला मिळो आणि तेही माझ्या हातानेच मिळो.
रेखाने एकदा ऐश्वर्या राय बच्चनसाठी भावनिक पत्रही लिहिले होते. ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी एका मासिकात रेखाने आपले प्रेम व्यक्त केले होते. रेखाने हे पत्र 'मेरी ऐश' असे लिहून सुरू केले, तर स्वतःला रेखाची आई म्हणून पत्राचा शेवट केला होता.
पत्रात रेखाने लिहीले होते की,‘तुझ्यासारखी स्त्री वाहत्या नदीसारखी खोट्या गोष्टी बाजूला सारून सतत वाहत असते, ‘तुला कुणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही. अनेक अडथळ्यांवर मात करत तू यश मिळवले आहे.’ एक उत्कृष्ट अभिनेत्री होण्याबरोबरच आराध्याची आई म्हणून खूप उत्तम भूमिका तू निभावत आहेस ती भूमिका मला जास्त आनंद देणारी आहे'.
रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा सिलसिला सगळ्यांनाच माहिती आहे. रेखा यांच्यासोबत अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरत होत्या. दुसरीकडे अमिताभ आणि जया बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात याच कारणामुळे वादळ निर्माण होत होते. शेवटी जया बच्चन यांनीच पुढाकार घेत रेखा यांच्याशी थेट यावर बोलायचे ठरवले. 'तू माझ्या पतीपासून दूर राहा' असे स्पष्ट शब्दात जया बच्चन यांनी रेखाला सांगितले होते. तेव्हापासून रेखा अमिताभ पासून दूर गेल्या. त्यानंतर त्यांनी कधीही चित्रपटातही एकत्र काम केलं नाही.