Join us

जेव्हा शाहरुखसोबतच्या चालू चित्रपटातून ऐश्वर्या रायला दाखवला होता बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:28 IST

किंग खान शाहरुख आणि  ऐश्वर्याच्या जोडीनेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासोबतच, सिनेमातील भूमिकांमुळे देखील चर्चेत पहायला मिळते.  ऐश्वर्या आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने तिने लाखो चाहतेही निर्माण केले आहेत. केवळ हिंदीच नाही तर ऐश्वर्याने तामिळ, तेलुगू, बंगाली आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे. 

ऐश्वर्याने आपल्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यासोबत काम केलं आहे. किंग खान शाहरुख आणि  ऐश्वर्याच्या जोडीनेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या दोघांनी मोहब्बतें, देवदास आणि जोशमध्ये एकत्र काम केले होते. दोघांमध्ये खऱ्या आयुष्यातही चांगली मैत्री होती, मात्र असे असतानाही शाहरुखच्या पाच चित्रपटांमधून ऐश्वर्याला वगळलं होतं. त्याचा परिणाम ऐश्वर्याच्या करिअर मोठा परिणाम झाला होता. 

 सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याला याबाबत विचारण्यात आले. तेव्हा तिने सांगितले की, मला चित्रपटातून कधी बाहेर फेकले गेले हे मलाही कळले नाही. तर एकदा बोलताना शाहरुखने याबद्दल खेद व्यक्त करत ऐश्वर्याची माफीही मागितली होती. तो म्हणाला होता की, 'एखाद्यासोबत प्रोजेक्ट सुरू करणे आणि नंतर कोणतीही चूक न करता कामावरून काढून टाकणे हे खूप कठीण आहे. होय मला वाटते की मी चुकीचे केले आहे. पण तो माझा नाही तर संपुर्ण टीमचा निर्णय होता'. 

ज्या चित्रपटांमधून ऐश्वर्याला काढून टाकण्यात आले होते. त्यात 'वीर जरा', 'चलते-चलते', 'कल हो ना हो' या चित्रपटांचा समावेश होता.  तर ऐश्वर्या आणि शाहरुख शेवटचे 2016 मध्ये करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'मध्ये एकत्र दिसले होते. ऐश्वर्या मणिरत्नमच्या 'पोनियिन सेलवन : 2' मध्ये पाहायला मिळाली. तर शाहरुखचा  'पठाण'  आणि 'जवान' बॉक्स ऑफिसवर मेगा ब्लॉकबास्टर ठरला. किंग खान लवकरच 'डंकी'मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनशाहरुख खानबॉलिवूड