Join us  

अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय भावुक, प्रेग्नंट दीपिकाला पाहून घेतली गळाभेट; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 8:49 AM

ऐश्वर्या लेकीला घेऊन आधी वेगळी आली, नंतर सोहळ्यामध्ये अभिषेकसोबतच दिसली

आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीलग्नबंधनात अडकला. १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे अनंत-राधिकाचा रॉयल विवाहसोहळा पार पडला. अख्ख्या जगाने डोळे दीपवणारा हा सोहळा पाहिला. काल शुभआशीर्वाद सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींची झलक दिसली. बच्चन कुटुंब, खान परिवार, साऊथ कलाकार, खेळाडू यांची मांदियाळी होती. या सगळ्यांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणजे ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांची झालेली गळाभेट.

अंबानींच्या सोहळ्यात बच्चन कुटुंब चांगलंच चर्चेत होतं. लग्नाच्या वेळी ऐश्वर्या आराध्याला घेऊन वेगळी आली. तर अमिताभ, अभिषेक, जया, श्वेता नंदा, नव्या नवेली आणि अगस्त्य हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे ऐश्वर्या आणि सासरच्या मंडळींमध्ये बिनसल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. सोशल मीडियावर या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच एक म्हणजे गरोदर दीपिकाला पाहून ऐश्वर्या भावुक झालेली दिसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं.  दोघींच्या गळाभेटीचा व्हिडिओ आता हायलाईट होत आहे. ऐश्वर्याने लाल रंगाचा सूट घातला आहे. तर दीपिकाही लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या टॉक ऑफ द टाऊन आहे.

ऐश्वर्या आराध्यासह वेगळी आली असली तरी आतला एक फोटो व्हायरल होतोय. जिथे अभिषेक बच्चनच्या बाजूला आराध्या बसली आहे तर ऐश्वर्याही जवळ उभी आहे. तसंच हृतिकही त्यांच्या बाजूला बसलेला आहे. हा फोटो पाहून अनेकांना 'धूम 2' ची आठवण झाली.

अंबानींच्या सोहळ्यात विकी-कतरिना, सिद्धार्थ-कियारा, रणबीर-आलिया, रणवीर-दीपिका या जोड्यांनी लक्ष वेधून घेतलं. तसंच जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत आली तर तिची बहीण खुशीही तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत दिसली. स्टारकीड्स असो किंवा स्टार्स सर्वांनीच सोहळ्याची रंगत वाढवली.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनदीपिका पादुकोणअनंत अंबानीलग्नबॉलिवूडसोशल मीडिया