Join us  

​ऐश्वर्या रायला मुंबई विमानतळावर धक्काबुक्की, आई जखमी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 8:06 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत मुंबई विमानतळावर धक्काबुक्की झाली. ऐश्वर्या आपली आई व मुलीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लंडन गेली ...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत मुंबई विमानतळावर धक्काबुक्की झाली. ऐश्वर्या आपली आई व मुलीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लंडन गेली होती. तेथून वापस आल्यानंतर विमानतळावर मीडियाने त्यांना घेरले. ऐश्वर्या स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र गर्दीत अडकून गेली. कसेतरी तिने आराध्याला सावरत पुढे निघाली. तेव्हाच एकाशी तिची आई वृंदा धडकली आणि ती खाली पडली. आईला जखम होऊन रक्तही निघू लागले.