बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने अनेक वर्षं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. तिने हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ऐश्वर्या ही मिस वर्ल्ड असून तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. ऐश्वर्या आजही तितकीच सुंदर दिसते. तिच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना खूप आवडते.
ऐश्वर्या राय सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते आणि फोटो शेअर करत असते. ऐश्वर्या अनेक वेळेला आराध्य, अभिषेक बच्चन यांच्यासोबत तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. फार कमी लोकांना माहित आहे की ऐश्वर्याला एक भाऊ आहे. ज्याचे नाव आहे आदित्य राय.
आदित्य मर्चंट नेव्हीमध्ये काम करत असून त्याचे लग्न शिमासोबत झालेले आहे. त्याची पत्नी श्रीमा ही दिसायला खूपच सुंदर असून तिने २००९ मध्ये मिसेस इंडिया हा किताब मिळवला आहे.
श्रीमाचे फोटो पाहिल्यानंतर श्रीमा ऐश्वर्या इतकीच सुंदर असल्याचे आपल्या लक्षात येते. श्रीमाचे अनेक ग्लॅमरस फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
श्रीमाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आदित्य आणि त्यांच्या मुलांचे देखील अनेक फोटो पाहायला मिळतात. श्रीमा ही मॉडेल असली तरी लग्नानंतर मुलांकडे लक्ष देण्यासाठी तिने तिचे करियर सोडले. त्यामुळे ती लाईमलाईटपासून दूरच असते.
त्यापूर्वी 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये ऐश्वर्या दिसली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण याचे श्रेय ऐश्वर्याऐवजी, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांना मिळाले.