बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan)ने तिच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट नाकारले किंवा करू शकली नाही, जे नंतर ब्लॉकबस्टर ठरले. यामध्ये 'कुछ कुछ होता है', 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'भूल भुलैया' सारख्या नावांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, ऐश्वर्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटालाही नकार दिला होता. तर ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)ही या चित्रपटात होता. ऐश्वर्याने एकदा एका मुलाखतीत चित्रपट नाकारण्याचे कारण काय होते हे सांगितले होते.
ऐश्वर्या राय बच्चनने 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला 'हॅप्पी न्यू इयर'ची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नसला तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. २०१४ मध्ये रिलीज झालेला 'हॅपी न्यू इयर' फराह खानने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्याशिवाय विवान शाह, सोनू सूद आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.
ऐश्वर्या म्हणाली...ऐश्वर्या राय म्हणाली होती, 'हो, मला चित्रपटाची ऑफर आली होती आणि जर मी त्यात काम केले असते तर ती एक मजेदार सहल झाली असती. खूप मजा आली असती, पण मला आणि अभिषेक बच्चनला ते जमलं नाही. कारण आमची जोडी चित्रपटात एकत्र नव्हती. या चित्रपटात शाहरुखच्या सोबत दीपिका पादुकोण आहे. चित्रपटात एकच महिला लीड आहे आणि अभिषेकच्या विरुद्ध कोणीही नाही. त्यामुळे माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी हे खूप विचित्र वाटलं असतं की मी या चित्रपटात असते आणि अभिषेकही चित्रपटात असताना माझी जोडी दुसऱ्या कोणाशी तरी झाली असती. त्यामुळेच मी चित्रपट नाकारला.