Join us

​कान्स गाजवून ऐश्वर्या राय भारतात परतली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2017 4:59 AM

यंदाचा ७० वा कान्स फिल्म्स फेस्टिवल कायम चर्चेत आहे. बॉलिवूडचे म्हणाल तर, यंदा दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, सोनम कपूर, ...

यंदाचा ७० वा कान्स फिल्म्स फेस्टिवल कायम चर्चेत आहे. बॉलिवूडचे म्हणाल तर, यंदा दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, सोनम कपूर, श्रुती हासन आदींनी या सोहळ्याला हजेरी लावली. आधी दीपिकाने कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. मग ऐश्वर्या रेड कार्पेटवर उतरली. रेड कार्पेटवरील ऐश्वर्याच्या लूकने बरीच वाह वाह लुटली आणि ही प्रशंसा व प्रेम घेऊन ऐश्वर्या भारतात परतली. आज सोमवारी सकाळी आराध्या व ऐश्वर्या मुंबई एअरपोर्टवर उतरल्या. आराध्यासोबतचे ऐश्वर्याचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ऐश्वर्या आपल्या कान्स दौºयाबद्दल कमालीची समाधानी आहे, हेच या फोटोंवरून दिसते. या फोटोंत आराध्याही कमालीची क्यूट दिसतेय.कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये इंडियन कांटेक्स्टच्या रूपात संजय लीला भन्साळींचा ‘देवदास’ सगळ्यांत मोठे आकर्षण राहिले. कान्समध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. कान्समध्ये सर्वाधिक लोकप्रीय असलेल्या ऐश्वर्याने हा चित्रपट कान्समध्ये सादर केला. ऐश्वर्या कान्स सोहळ्यात सामील होणारी सर्वाधिक जुनी बॉलिवूड अभिनेत्री आहे. २००२ मध्ये तिने सर्वप्रथम कान्स सोहळ्यात हजेरी लावली होती. यंदाही कान्समध्ये ऐश्वर्याचीच धूम राहिली.ALSO READ : Cannes 2017 : ऐश्वर्या रायने तोडला रेड कार्पेटचा नियम!सोहळ्यात ऐश्वर्याने एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडला प्रमोट केले. यंदा कान्सच्या पहिल्या दिवशी ती मायकल सिन्को याने डिझाइन केलेल्या पाउडर ब्लू रंगाच्या बॉल गाउन ड्रेसमध्ये रेडकार्पेटवर उतरली. या ड्रेसमध्ये ती प्रिन्ससेससारखी दिसत होती.  दुसºया दिवशी ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली.  लाल रंगाच्या गाउनवर मोकळे केस, रुबी लावलेले डायमंड एअरिंग शिवाय गाउनच्या रंगाशी मॅच होणारी लिपस्टिक हे सगळेच तिचे सौंदर्य खुलविणारे होते.