Join us

Salman Khan -Aishwarya Rai : सलमानसोबतच्या ब्रेकअपबद्दल ऐश्वर्या रायचं मौन का? म्हणाली, "माझं कुटुंब मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:10 PM

सलमान खान, ऐश्वर्या राय ही जोडी पडद्यावर जितकी छान दिसायची तितकीच ऑफस्क्रीनही गाजली होती.

बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या आहेत ज्यांचं नातं लग्नापर्यंत गेल्या तर काही जोड्यांचा मात्र शेवटच झाला. अशाच काही जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai). ही जोडी पडद्यावर जितकी छान दिसायची तितकीच ऑफस्क्रीनही गाजली होती. चाहते तर या जोडीच्या प्रेमात होते. मात्र काही कारणाने सलमान ऐश्वर्या दोघेही एकमेकांपासून कायमचे दुरावले. या ब्रेकअपची बीटाऊनमध्ये खूपच चर्चा झाली.

अभिनेत्री सिमी गरेवालच्या चॅट शो मध्ये ऐश्वर्याला सलमानसोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ऐश्वर्या म्हणाली, 'ती गोष्ट आता संपलेली आहे. त्या गोष्टीचा आता मी विचारच करत नाही त्यामुळे आता बोलणं सोडाच. तो माझा भूतकाळ होता. मी माझ्या कुटुंबासोबत राहते त्यामुळे मला यावर बोलायला आवडत नाही. कुटुंबातील सदस्य देखील मला पाहतात, ऐकतात.' 

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी ज्याच्याबद्दल बोलत आहे, त्याचं देखील कुटुंब आहे. सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. म्हणून मी भूतकाळाबद्दल बोलत नाही. मी एक सामान्य मुलगी आहे, हे मी विसरलेली नाही आणि मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे, ते देखील सामान्य व्यक्ती आहेत.'

सलमान आणि ऐश्वर्या यांनी ब्रेकअपनंतर एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही. आजही ते सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांसमोर येणं टाळतात. ऐश्वर्या तिच्या आयु्ष्यात खूप पुढे गेली आहे. तिने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्नगाठ बांधली. तर दोघांना आराध्या ही लेकही आहे. दुसरीकडे सलमान खान मात्र आजही एकटा आहे.

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चनरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट