अशी सुरू झाली होती ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्हस्टोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 02:04 PM2021-06-18T14:04:16+5:302021-06-18T14:06:18+5:30
हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान आणि ऐश्वर्याचे प्रेम फुलले. ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सलमान अक्षरशः फिदा झाला होता. या दोघांचे अफेअर अनेक वर्षं सुरू होते. सलमानसाठी तिने हम तुम्हारे है सनम या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. तिला अनेकवेळा सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील पाहायला मिळत असे. पण ऐश्वर्याच्या कुटुंबियांना तिचे सलमानसोबत असलेले नाते पसंत नव्हते. नोव्हेंबर 2001 मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दारूच्या नशेत प्रचंड गोंधळ घातला होता. सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती. त्याने त्यावेळात ऐश्वर्याच्या वडिलांसोबत गैरवर्तुणूक केली होती असे म्हटले जाते.
सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच व्यक्तीसोबत आपण सगळ्यात जास्त भांडतो. सलमान आणि ऐश्वर्यात वाद सुरू असतानाच ऐश्वर्याला काहीही न सांगता सलमान त्याची पूर्वप्रेयसी सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले असे इंडिया टूडेने त्यांच्या वृत्तात म्हटले होते.