अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या ‘गुरू’ या सिनेमाला 14 वर्षे पूर्ण झालीत आणि या सिनेमाच्या आठवणी जाग्या झाल्यात. ऐश्वर्याने ‘गुरू’च्या प्रीमिअरचे काही फोटो शेअर करत,जुन्या आठवणींना उजाळा दिला. न्यूयॉर्कमध्ये मणिरत्नम दिग्दर्शित या सिनेमाचा प्रीमिअर पार पडला होता. ऐश्वर्या, अभिषेक आणि मणिरत्नम या प्रीमिअरला हजर होते.प्रीमिअरसाठी ऐश्वर्याने खास निळ्या रंगाची साडी निवडली होती. अभिषेक ब्लॅक सूटमध्ये तर मणिरत्नम ग्रीन कलरच्या सूटमध्ये दिसले होते.
ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिषेक मीडियाला मुलाखत देतोय आणि ऐश्वर्या त्याच्या मागे उभी आहे. तिच्या चेह-यावर खट्याळ हास्य आहे. ‘आजच्या दिवशी... 14 वर्षे... कायम गुरु....,’ असे कॅप्शन तिने हे फोटो शेअर करताना दिलेआहे.‘गुरू’ आणि ‘गुरू’चे न्यूयॉर्कमधील प्रीमिअर ऐश्वर्या व अभिषेकसाठी अनेकार्थाने खास आहे. कारण याच प्रीमिअरनंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.
पहिली भेटऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये याचदरम्यान ऐश्वर्या तिच्या ‘और प्यार हो गया’ या पहिल्या चित्रपटाचे शूटींग करत होती. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट होता बॉबी देओल. बॉबी हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याचठिकाणी अभिषेक ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता.
अशी झाली होती नजरा-नजर
ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ‘बंटी और बबली’या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्याचे शूटींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे उमराव जानमध्ये दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. ‘गुरू’च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, मी आणि ऐश्वर्या ‘गुरू’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्याचवेळी येथील हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून मी ऐश्वर्याबद्दल विचार करत होतो. ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्य किती आनंदी असेल, असा विचार मनात सुरु होता. यानंतर टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये ‘गुरू’च्या प्रीमिअरदरम्यान आम्ही न्यूयॉर्कच्या त्याच हॉटेलात थांबलो होतो. मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला प्रपोज केले.
फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोजअभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्यानेयाबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे, तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो, असे ती म्हणाली होती. 2007 मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि याचवर्षी 20 एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले.
ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क 12 किलो वजन