Join us

मॉडेलिंगच्या दिवसात Aishwarya Rai दिसायची खूपच सुंदर, अभिनेत्रीचा रॅम्प व्हिडीओ लावेल तुम्हाला वेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:45 AM

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. ती १९९४ साली मिस वर्ल्ड बनली होती. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही बॉलिवूडमधील दिग्गज आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंगमुळे ती बराच काळ चर्चेत राहिली होती. ऐश्वर्या राय १९९४ साली मिस वर्ल्ड बनली होती. त्यानंतर तिने अभिनयाच्या जगतात प्रवेश केला. पण तुम्ही कधी ऐश्वर्या रायला मॉडेलिंग करताना किंवा रॅम्पवर चालताना पाहिले आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला तिच्या मॉडेलिंगच्या काळातील व्हिडीओ दाखवतो.

सध्या ऐश्वर्या रायचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या मॉडेलिंग दिवसांचा आहे. ज्यामध्ये ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रॅप वॉक करताना दिसत आहे. या ड्रेसेसमध्ये अभिनेत्रीची सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या रायने १९ नोव्हेंबर, १९९४ साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

ऐश्वर्या रायने आपल्या क्षमते आणि कौशल्याच्या जोरावर हे विजेतेपद मिळवले होते. जेव्हा तिला मिस वर्ल्डचा किताब मिळाला तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. ऐश्वर्या रायने ८६ देशांच्या सौंदर्यवतींना हरवून हा ताज जिंकला. तिच्यानंतरही भारतातील अनेक सौंदर्यवतींनी हे विजेतेपद पटकावले, मात्र आजही ऐश्वर्याच्या सौंदर्याची जगभरात चर्चा आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर तिला बॉलिवूडमधील चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या आणि त्यानंतर ऐश्वर्याने अभिनयाच्या जगतात पाऊल ठेवले.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन