कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते ऐश्वर्या रायबरोबर ज्युनियर बी अर्थात अभिषेक बच्चनच्या तिच्या आयुष्यात आला. अभिषेक ऐश्वर्या राय बच्चनसह रेशीमगाठीत अडकला. त्यांचा आता सुखी संसार सुरु आहे. अभि-ऐशच्या जीवनात आराध्या नावाची परी आलीय. हे तर झालं ऐश्वर्याच्या सध्याच्या आयुष्याबद्दल. लग्नाआधी ऐश्वर्या रायचे बर्याच कलाकारांशी प्रेमसंबंध होते आणि आज आम्ही आपल्याला याबद्दल सांगणार आहोत.
1. राजीव मुलचंदानी
जेव्हा ऐश्वर्या रायने मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले तेव्हा ती पहिल्यांदा प्रेमात पडली .राजीव मुलचंदानीसह तिचे नाव जोडले गेले होते. मात्र नंतर काही कारणामुळे त्यांचे ब्रेकअपही झाले.
2. हेमंत त्रिवेदी
त्यानंतर हेमंत त्रिवेदीसह तिचे नाव जोडले गेले होते . हेमंत प्रसिद्ध फॅशन डिजाइनर आहेत.
3. अक्षय खन्ना
अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय दोघांमध्ये जवळीक वाढली होती.त्याच दरम्यान ऐश्वर्याची मैत्री सलमानसह झाली होती.सलमानमुळे ऐश्वर्या अक्षय खन्नापासून दुरावली गेल्याचे बोलले जाते.
4. सलमान खान
हम दिल दे चुके सनममध्ये नंदिनी आणि समीरचा ऑन स्क्रीन रोमान्स सुरु असताना ऑफ स्क्रीनही दोन हृदय एकमेंकामध्ये गुंतले होते... ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय...
दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या.. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही. मात्र 2001 साली दोघांच्या प्रेमकहाणीत आलं मोठं वादळ... सलमान खाननं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं ऐश्वर्याचं कथित विधान एका इंग्रजी दैनिकानं छापलं... त्यानंतर दोघांच्याही नात्यात कायमचा दुरावा आला...
5. विवेक ओबेरॉय
त्याच दरम्यान क्यों हो गया नाच्या सेटवर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयमध्ये जवळीक वाढत असल्याच्याही वावड्या उठल्या... त्यामुळंच विवेक आणि सलमानमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या...
सलमान असो किंवा विवेक... कुणीही ऐश्वर्याच्या मनाचा राजा होऊ शकलं नाही.. मात्र ज्युनियर बीनं ऐशचं मन जिंकत तीचासह संसार थाटला.