Join us

OMG! अजय देवगणने तान्हाजीच्या यशानंतर राजामौली यांच्या चित्रपटासाठी घेतले इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 3:09 PM

तान्हाजीच्या या यशामुळे अजय देवगणचा भाव आता चांगलाच वाढला आहे.

ठळक मुद्देअजय आणि एसएस राजामौली यांची खूपच चांगली मैत्री आहे आणि त्याचमुळे मैत्रीखातर अजयने राजामौली यांच्याकडून कोणतीच फी घ्यायची नाही असे ठरवले आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. हेच कारण आहे की, अनेक चित्रपटांचे आव्हान असूनही चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. अलीकडे रिलीज झालेले ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’,‘पंगा’, ‘जवानी जानेमन’ हे सिनेमेही ‘तान्हाजी’ची घोडदौड थांबवू शकले नाहीत. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत या चित्रपटाने एकापाठोपाठ एक नवनवे विक्रम रचण्याचा धडाका लावला आहे. कमाईच्या बाबतीत ‘तान्हाजी’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. आता तर या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे. 

तान्हाजीच्या या यशामुळे अजय देवगणचा भाव आता वाढला आहे. अजय या चित्रपटानंतर बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटासाठी अजयने किती पैसे घेतले हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल... अजय देवगण त्याच्या सगळ्याच चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेतो आणि आता तर त्याच्या तानाजीने बॉक्स ऑफिसवरचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. पण असे असूनही अजयने राजामौली यांच्या आगामी चित्रपटासाठी एकही रुपया मानधन म्हणून घेतलेला नाही.

अजय आणि एसएस राजामौली यांची खूपच चांगली मैत्री आहे आणि त्याचमुळे मैत्रीखातर अजयने राजामौली यांच्याकडून कोणतीच फी घ्यायची नाही असे ठरवले आहे. 

अजयने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. काजोल, अजय देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकार देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

टॅग्स :अजय देवगणतानाजी