अजय देवगण (Ajay Devgan) हा बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे जो फिल्मी पार्ट्यांपासून दूर राहतो. इतकेच नाही तर हा अभिनेता क्वचितच विमानतळावर पापाराझींसाठी पोज देताना दिसतो. आता अजय देवगणने खुलासा केला आहे की तो बॉलिवूड स्टार्सच्या पार्ट्यांना का जात नाही आणि पापाराझींसमोर पोज का देत नाही. अभिनेता अलीकडेच करण जोहर(Karan Johar)च्या चॅट शो कॉफी विथ करण ८ (Koffee With Karan 8)च्या एपिसोडमध्ये दिसला. यादरम्यान अजय देवगणने शोमध्ये स्वतःबद्दल अनेक खुलासे केले, जे ऐकून त्याचे चाहते चकीत झाले आहेत.
शोच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहरने अजय देवगणला बरेच रंजक प्रश्न विचारले. त्याने अभिनेत्याला विचारले की, तो बॉलिवूड फिल्म पार्ट्यांमध्ये का दिसत नाही? यावर अजय देवगणने मजेशीरपणे उत्तर दिले की, 'मला कोणीही पार्टीला आमंत्रित करत नाही.' यानंतर करण जोहरने अभिनेत्याला विचारले की पापाराझींनी त्याला विमानतळावर का पाहिले नाही? या प्रश्नावर अजय देवगणने हैराण करणारी गोष्ट उत्तर दिले.
अजय देवगणनं सांगितलं इंडस्ट्रीतल्या शत्रूबद्दल
अजय देवगण म्हणाला, 'मी पापाराझींना बोलवतच नाही.' रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहर अजय देवगणला विचारले की, "इंडस्ट्रीमध्ये तुझा कोणी शत्रू आहे का आणि असेल तर कोण?" त्याच्या इस्टंट रिएक्शनने अजयने त्याला चकित केले. अजयने उत्तर दिले की, 'तू...' हे ऐकून करण त्याचा गळा दाबून म्हणतो, "मला मोठा धक्का बसला आहे." याशिवाय करण जोहरने अजय देवगणला आणखी अनेक प्रश्न विचारले आहेत.