बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol). ही जोडी लोकांना खूप आवडते. वास्तविक जीवनात पाहिले तर काजोल-अजयची केमिस्ट्री पडद्यावर दिसणार्या केमिस्ट्रीपेक्षा मजबूत आहे. काजोलने वडिलांच्या विरोधात जाऊन अजय देवगणशी लग्न केले असले तरी आज तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगन यांनी १९९९ मध्ये लग्न केले आणि त्यांच्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली. लग्नानंतर काजोलने फिल्म इंडस्ट्रीकडे पाठ फिरवली आणि कौटुंबिक जीवनाला अधिक महत्त्व दिले.
काजोल आणि अजय देवगण दोघांनीही लग्नाआधी काही काळ एकमेकांना डेट केले होते. काजोल आणि अजय देवगणने 'इश्क', 'प्यार तो होना ही था'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, परंतु प्रेक्षकांना तिची आणि शाहरुख खानची जोडी जास्त आवडली. काजोलने शाहरुखसोबत बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है यांसारख्या चित्रपटात काम केले. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.
काजोलला शाहरुख सोबत काम करण्यास होती मनाईमीडिया रिपोर्टनुसार आणखी एक गोष्ट समोर आली आहे. एक काळ असा होता की अजयला काजोल आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीचा खूप हेवा वाटायचा. त्यामुळेच त्याने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला होता. लोक काजोल आणि अजयच्या नात्याबद्दल कमी आणि काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीबद्दल जास्त बोलायचे. अजयला ही गोष्ट अजिबात आवडली नाही.त्यामुळेच त्याने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला.
त्यावर किंग खान म्हणाला...एका मुलाखतीत शाहरुखला विचारण्यात आले की अजयने काजोलला त्याच्यासोबत काम करण्यास मनाई केली होती का? यावर शाहरुख म्हणाला होता की अजयने अशी काही अट ठेवली आहे की नाही हे मला माहीत नाही. जर काजोल माझ्यासोबत काम करणार नाही कारण अजयने तिला नकार दिला असावा, तर मी अजयच्या निर्णयाचा आदर करतो. पण असे झाले आहे असे मला वाटत नाही. हे नक्कीच थोडे विचित्र आहे. गौरी जर अभिनेत्री असती तर त्याने तिला कधीच सांगितले नसते की तुला कोणासोबत काम करायचे आहे आणि कोणासोबत नाही.
काजोल दिसणार 'द ट्रायल' वेब सीरिजमध्ये काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, काजोल बर्याच काळानंतर 'द ट्रायल' या आगामी वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमेरिकन सीरिज 'द गुड वाईफ' हे 'द ट्रायल' हिंदी रिमेक आहे. या मालिकेची निर्मिती अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन आणि राजेश चढ्ढा यांनी केली आहे.