Join us

अजय देवगणचा 'मैदान' सेन्सॉर बोर्डाकडून पास! पण एक 'डिस्क्लेमर' टाकण्याची मेकर्सला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:23 PM

'मैदान' च्या निर्मात्यांना सिनेमासोबत एक डिस्क्लेमर जोडण्यास सांगण्यात आलंय.

अजय देवगणचा (Ajay Devgn) बहुप्रतिक्षित 'मैदान' (Maidaan) सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. अजय सिनेमात फुटबॉल कोचच्या भूमिकेत आहे. आता सिनेमा सेन्सॉर बोर्डच्याही परीक्षेत पास झाला आहे. सिनेमाला यु/ए सर्टिफिकेट मिळालं आहे. मात्र यासोबत एक सूचना म्हणजेच डिस्क्लेमर जोडण्यास मेकर्सला सांगण्यात आलंय. काय आहे ते डिस्क्लेमर?

माध्यम रिपोर्टनुसार, 'मैदान' च्या निर्मात्यांना सिनेमासोबत एक डिस्क्लेमर जोडण्यास सांगण्यात आलंय. यामध्ये लिहिण्यात आलंय की, "हा सार्वजनिक सिनेमा सत्य घटना, महान फुटबॉलपटूंचे विचार आणि काल्पनिक तत्वाच्या लेखकांच्या शोधावरुन प्रेरित काल्पनिक कृती आहे. काही संवादांचा उपयोग घटनांना नाटक स्वरुपात दाखवण्यासाठी केलेला आहे. सिनेमाची निर्मिती कोणाच्याही भावना भडकवण्यासाठी करण्यात आलेली नाही. यासोबतच सिनेमात आवश्यक तिथे धुम्रपान विरोधी सूचना देण्यासंदर्भातही सांगण्यात आलं आहे. अंतिम क्रेडिट हिंदीतही असले पाहिजेत. सिनेमा १८१ मिनिटांचा आहे म्हणजेच जवळपास तीन तास चालणार आहे. 

सैय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. अजय देवगणने त्यांचीच भूमिका साकारली आहे. रहीम यांनी संपूर्ण जीवन फुटबॉलसाठी समर्पित केलं आणि देशाचं नाव उंचावलं. सिनेमात 1951 आणि 1962 च्या आशियाई खेळांमधील भारतीय टीमच्या यशाचा कहाणी दाखवण्यात आली आहे. 

सिनेमात अजय देवगणसोबतच प्रियामणि, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्या भूमिका आहेत.  बोनी कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अमित शर्मा यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून १० एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया'ही रिलीज होतोय. 

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडसिनेमाबोनी कपूर