​अजय देवगन दिसेल या पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2017 06:42 PM2017-01-14T18:42:52+5:302017-01-14T18:42:52+5:30

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने आतापर्यंत आपल्या अनेक चित्रपटातून कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारल्या आहेत. ‘गंगाजल’ या चित्रपटातील पोलीस अधिकाºयाच्या ...

Ajay Devgan will appear in the role of the police officer! | ​अजय देवगन दिसेल या पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत!

​अजय देवगन दिसेल या पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत!

googlenewsNext
लिवूड अभिनेता अजय देवगनने आतापर्यंत आपल्या अनेक चित्रपटातून कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारल्या आहेत. ‘गंगाजल’ या चित्रपटातील पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेसाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगन आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटात कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

अजय देवगन याच्या ‘गंगाजल’ व ‘सिंघम’ या चित्रपटातून साकारलेला कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावला.  मध्यप्रदेशातील आयपीएस अधिकारी गौरव तिवारी याने केलेल्या एका घटनेच्या तपासावर निर्माता-दिग्दर्शक मधूर भांडारकर चित्रपटाची तयारी करीत असून यात अजय देवगन मुख्य भूमिका करणार असल्याचे कळतेय. आयपीएस अधिकारी गौरवी तिवारी याने कटनी येथे पोस्टिंग असताना देशातील बँकेमधील सर्वांत मोठा ५०० कोटींचा हवाला घोटाळा उघड केला होता. मात्र फक्त सहा महिन्यातच गौव तिवारी याची बदली कटनीहून छिंदवाडा येथे करण्यात आली होती. मात्र या बातमीमुळे कटनीत जनाक्रोश निर्माण झाला व गौरव तिवारीच्या समर्थनात कटनीचे लोक सडकेवर आले होते. 

Ajay Devgan in Madhur Bhadarkar next film; role of SP Gaurav Tiwari

एसपी गौरव तिवारीची बदली थांबविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना लोकांनी पत्र लिहले होते. लोकांचे हे समर्थन पाहून निर्माते मधूर भांडारकर यांनी एसपी गौरव तिवारीवर चित्रपटाची तयारी करीत आहेत. यासाठी मधूर भांडारकर यांनी एका न्यूज चॅनलकडून फुजेट मागविले असल्याचे कळतेय. या चित्रपटासाठी मधूरने अजय देवगनला पसंती दर्शविली आहे. मधूर भांडारकरच्या मते, अजय शिवाय ही भूमिका कुणी दुसरा अभिनेता निभवूच शकणार नाही. हा चित्रपटाची तयारी केली जात असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र निर्मात्यांकडून याची अद्याप याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 

  गौरव तिवारी याची कामगिरी
- एक्सिस बँकेचा ५०० कोटी रुपयांचा हवाला घोटाळा 
- बालाघाटमध्ये लाकूड माफियाच्या विरोधात अभियान, यात अनेक बड्या अधिकाºयांचा समावेश
-  केवळ ६ महिन्यातच कटनीहून छिंदवाड्याला बदली. ९ जानेवारीला घेतलेल्या या निर्णयाविरोधात कटनीच्या जनतेत आक्रोश
- विरोध करण्यांत राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व महिला संघटनांचा समावेश

Web Title: Ajay Devgan will appear in the role of the police officer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.