दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटात स्टार्सची फौज पाहायला मिळतेय. यात करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि इतर कलाकार आहेत. पण, सिंघम अगेन पाहण्यापुर्वी तुम्ही यापुर्वीचे दोन्ही भाग पाहिले आहेत का ? तर ते तुम्ही कुठे पाहू शकता हे जाणून घेऊया.
अजय देवगनचा 'सिंघम'चा पहिला भाग २०११ मध्ये आला होता. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. तर दुसरा भाग हा 'सिंघम रिटर्न्स' (2014) मध्ये आला होता. यात अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका केली होती. करिनाने 'सिंघम रिटर्न्स' (2014) मध्ये अवनीची भूमिका केली होती, ती 'सिंघम अगेन'मध्येही पाहायला मिळतेय.
जर तुम्हाला सिंघम आणि 'सिंघम रिटर्न्स' पुन्हा पहायचे असतील तर तुम्ही ते प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. तर दुसरा भाग 'सिंघम रिटर्न्स' हा Jio Cinema ॲपवरही उपलब्ध आहे. तर आता प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन'मध्ये अॅक्शन आणि कॉमेडीचा मेळ घालत मनोरंजनाचे परीपूर्ण पॅकेज देण्याचा प्रयत्न केला आहे. अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे.