Join us

"यापुढे आम्ही काळजी घेऊ...", अजय देवगणने मान्य केली 'सिंघम अगेन' मधील 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:59 IST

'सिंघम अगेन' चं अपयश, अजय देवगणने मान्य केली ती गोष्ट

अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'सिंघम अगेन' गेल्या दिवाळीत रिलीज झाला होता. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात अनेक कलाकारांची मांदियाळी होती. मात्र बॉक्सऑफिस आकडे पाहता हा सिनेमा फारशी कमाल करु शकला नाही. सिनेमाच्या रिलीज दिवशीच कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैय्या ३' ही रिलीज झाला होता. त्याचाही यावर परिणाम झाला. तसंच सिंघम अगेन मध्ये अजय देवगण त्याच्या 'सिंघम' अवतारात तसा कमीच दिसला. यावरही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता नुकतंच अजय देवगणने यावर उत्तर दिलं आहे.

बाजीराव सिंघम ही अजय देवगणची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय भूमिका आहे. मात्र सिंघम अगेन मध्ये त्याचा तो अवतार फारसा दिसलाच नाही. व्हिलनची धुलाई करतानाचे त्याचे सीन्स कमीच आहेत. यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगण म्हणाला, "मला अनेकांकडून हीच रिअॅक्शन मिळाली आहे. घरात घुसून व्हिलनची धुलाई करणारा सिंघमचा अवतार यापुढे नक्की दिसेल याची आम्ही काळजी घेऊ."

'सिंघम' ही फ्रँचायझी बॉलिवूडमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. पहिला सिंघम तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता.  यावेळी दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या'सिंघम अगेन'ने २६८ कोटींची कमाई केली. तर जगभरात सिनेमाने ३८९ कोटींचा बिझनेस केला, अजय देवगण आता आगामी 'रेड २' मध्ये दिसणार आहे. तसंच तो सध्या 'सन ऑफ सरदार २' च्याही शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडरोहित शेट्टीसिनेमा