Join us

रंगरुपावरुन अनेकांनी हिनवलं, आज 28 सुपरहिट सिनेमा देऊन ठरला बॉलिवूडचा 'सिंघम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:29 IST

Bollywood actor: आपकी अदालत या कार्यक्रमात त्याने त्याच्या स्ट्रगल काळात लोकांनी कशी वागणूक दिली यावर भाष्य केलं.

बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला अनेक कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. यात काही असेही कलाकार आहेत ज्यांनी शुन्यातून विश्व उभं केलं आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. सुरुवातीच्या काळात या अभिनेत्याला अनेकांनी त्याच्या रंगरुपावरुन हिनवलं. मात्र, आज त्यानेच बॉलिवूडमध्ये १ किंवा २ नाही तर तब्बल २८ सुपरहिट सिनेमा दिले आहेत.

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती अभिनेता अजय देवगण (ajay devgn) याची.  आजवरच्या कारकिर्दीत त्याने असंख्य सुपरहिट सिनेमा दिले. त्याचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याला सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल करावा लागला. अनेकांनी त्यांच्या रंगरुपाची खिल्ली उडवली.

१९९१ मध्ये 'फूल और कांटे' या सिनेमातून अजयने इंडस्ट्रीत पदार्पण केलं.  मात्र, सिनेमा हिट झाल्यावरही त्याला अनेकांनी दिसण्यावरुन टोमणे मारले होते.  आपकी अदालत या हिट टीव्ही शोमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं होतं.

"मी महेश भट्ट यांचं एक आर्टिकल वाचलं होतं ज्यात तुमचा उल्लेख होता. तू इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच काही ट्रेंड पंडितांनी तुला पाहून, 'हा असा दिसणारा मुलगा हिरो कसा काय होईल', अशा कमेंट केल्या होत्या?", असं रजत शर्मा म्हणाले. याचं उत्तर देत अजयने सुरुवातीच्या काळात त्याच्यासोबत घडलेले काही किस्से सांगितले.रंगरुपावरुन झाला ट्रोल

"तुम्ही जे वाचलं ते लोकांनी मला  तोंडावरही सांगितलं होतं. पण, आता जे घडलं ते घडलं. पंडित लोक चुकीचे ठरले. मी खुप लोकांकडून काही ना काही ऐकलं होतं. पण, माझ्यासमोर असेही काही पॉझिटिव्ह लोक होते ज्यांना वाटायचं मी जे करतोय ते योग्य आहे", असं अजय म्हणाला.

दरम्यान, आजवरच्या कारकिर्दीत अजयने असंख्य सुपरहिट सिनेमा दिले आहेत. यात त्याची सिंघम सीरिज तर प्रचंड गाजली. नुकताच तो शैतान या सिनेमात झळकला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता आर. माधवन याने स्क्रिन शेअर केली आहे.

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडमहेश भटसेलिब्रिटीसिनेमा