Join us

लेकाच्या वाढदिवशी भावूक झाले अजय-काजोल, ' थोड़ा आहिस्ते आहिस्ते बड़ा हो यार...' म्हणत फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:26 IST

काजोल आणि अजय देवगणचं मुलांसोबतचं नातं खूपच स्पेशल आहे.

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांचा मुलगा युग याचा आज तेरावा वाढदिवस आहे. काजोल आणि अजय देवगणचं मुलांसोबतचं नातं खूपच स्पेशल आहे. काजोल आणि अजय अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या मुलाविषयी सांगत असतात. युगच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही खास पोस्ट केल्या आहेत.

अजयने सोशल मीडियावर युगसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत युग आणि अजय दोघेही दिसत आहेत. अजयने कॅप्शनमध्‍ये लिहीले आहे की, " वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा... ‘थोडं हळूहळू मोठा हो यार’''. या फोटोमध्ये दोघांमधील मजबूत बॉन्डिंग दिसून येत आहे. 

दरम्यान, अभिनेत्री काजोलने देखील इन्स्टाग्रामवर युगला शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केली. “13 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय बेबी बॉय. हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. तू मोठा होत आहेस हे आपल्या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, अशा शब्दांत काजोलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसोबत काजोलने मायलेकाचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. काजोलच्या फॅन्सनींही युगला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

अजय-काजोलने 1999 मध्ये लग्नगाठ बांधली होती. काजोल आणि अजय देवगणला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी न्यासाचा जन्म 20 एप्रिल 2003 रोजी झाला, तर मुलगा युगचा जन्म 13 सप्टेंबर 2010 रोजी झाला.  इतर सेलिब्रेटींच्या मुलांप्रमाणे युग आणि न्यासा मीडियामध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत.

टॅग्स :अजय देवगणकाजोलबॉलिवूडसेलिब्रिटी